शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आयटकचा किसान मुक्ती दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:08 IST

विविध मागण्या : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

धुळे : भाकप प्रणित अखिल भारतीय ट्रेड युनियन कौन्सिल अर्थात आयटकने ९ आॅगस्ट क्रांतीदिनी ‘भारत बचाओ’ आणि ‘किसान मुक्ती दिन’ पाळून प्रंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे़निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लागु केलेल्या लॉकडाऊनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरीत मजुर, व्यावसायिक, शेतकरी हे सर्व घटक अडचणीत सापडले आहेत़ असे असताना केंद्र तसेच राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही़ लॉकडाऊन काळात कामगारांना वेतन द्यावे, कामगार कपात करु नये असे आदेश असताना बहुसंख्य उद्योगांनी कायम, कंत्राटी आणि हंगामी कामगारांना वेतन दिले नाही़ याउलट कामावरुन काढून बेरोजगारीमध्ये भर घातली आहे़ रोजगार बंद झालेल्या कामगार, कष्टकरी, स्थलांतरीत कामगारांना व गरजूंना सरकारी गोदामात प्रचंड धान्यसाठा असताना वेळेवर पुरेसे अन्नधान्य मिळाले नाही़ त्यामुळे श्रमीक व गरीबांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे़ विशेषत: स्थलांतरीत कामगारांचे प्रचंड हाल झाले़ अनेकांचा अपघाती मृत्यू झाला़ कामगारांचे वेतन, आरोग्य सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, मानवी प्रतिष्ठा या सर्वांवर हल्ला केला जात आहे़ या महामारीत शेतकरी पुर्णपणे हवालदील झाला आहे़ या हल्ल्याच्या विरोधात ९ आॅगस्टला केंद्रीय कामगार संघटनांनी देशभर निदर्शने केली़ कामगार कायदे रद्द करुन नये, कामगारांना वेतन द्यावे, आयकर लागू नसलेल्या कुटूंबांना साडेसात हजार रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या़ निवेदनावर हिरालाल सापे, हिरालाल परदेशी, पोपटराव चौधरी, वसंत पाटील, साहेबराव पाटील, गुलाबराव पाटील, रमेश पारोळेकर, अशोक बाविस्कर, एल़ आऱ राव, प्रशांत वाणी, राजेंद्र चौरे, दिपक सोनवणे, शरद पाटील, प्रमोद सिसोदे, आसीफ शेख, जावीद मिर्झा आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे