शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढल्यास भावी पिढीसाठी शेती वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:18 IST

कुलगुरु डॉ.के.पी. विश्वनाथा : कृषी विज्ञान केंद्रात २९वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शेतीची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत असून स्थानिक युवकांमध्ये शेतीबाबत उदासिनता दिसून येत आहे. हे चित्र बदलावयाचे असेल तर शेती बरोबरच शेती आधारित जोडधंदे, उद्योगांना महत्व देणे गरजेचे आहे. तसेच एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास व गायी, म्हशी पालन, शेळीपालन, कुक्कूटपालन, मत्स्यशेती, मधुमक्षीका पालन, गांडुळ खत प्रकल्प यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईलच. त्याचबरोबर या उद्योगातील मिळणाºया उपपदार्थांपासून जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढविण्यास मदत होईल. अशा उत्पादक जमिनींचे हस्तांतरण पुढील पिढींना केल्यास त्यांच्यासाठी शेती एक वरदान ठरेल, असे प्रतिपादन राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा यांनी केले.येथील कृषि विज्ञान केंद्रात ३ जानेवारी रोजी २९वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शरद गडाख (संचालक विस्तार शिक्षण, म.फु.कृ.वि., राहुरी), डॉ.अंकुश कांबळे (शास्त्रज्ञ, कृषी अर्थशास्त्र, भा.कृ.अ.प.-अटारी, पुणे), डॉ.सुरेश दोडके (गहु विशेषज्ञ, कृषि संशोधन केंद्र, निफाड जि. नाशिक), डॉ.के.बी. पवार (कनिष्ठ रोग शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव), डॉ.एम.एस. महाजन (कृषि विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, धुळे), भालचंद्र बैसाणे (उपविभागीय कृषि अधिकारी, धुळे), डॉ.एस.पी. सोनवणे (प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी, कृषि महाविद्यालय, धुळे), डॉ.भगवान देशमुख (सहाय्यक प्राध्यापक, विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी), डॉ. हेमंत बाहेती (कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव), हितेंद्र खलाणे, (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, धुळे), अविनाश गायकवाड (मत्स्य विभाग, धुळे), पी.एम. सोनवणे (कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे), रेवती कुलकर्णी (विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, धुळे) आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी व उद्योजक श्रीराम पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, समाधान बागुल, शोभाबाई जाधव, विकास माळी, विनोद पाटील, आरिफ शेख यांनी त्यांच्या यशोगाथा मान्यवरांपुढे मांडल्या.डॉ. शरद गडाख म्हणाले, कृषि विज्ञान केंद्र, धुळेच्या कार्यकक्षेतील गावांचे बेसलाईन सर्वेक्षण व्हावे. कृषि विज्ञान केंद्राच्या हस्तक्षेपापुर्वी व नंतर झालेल्या बदलांची नोंद घेवून त्याच्या परिणांमाचे सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आदी अहवाल तयार करावेत. विविध विस्तार साधनांचा वापर करून जसे कि एस.एम.एस. सेवा, व्हॉट्सएप मेसेजेस, वर्तमानपत्र, रेडिओ, टी.व्ही.च्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. खासकरून हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता, आगामी संकटांचे अवलोकन आणि चेतावनी देणे गरजेचे आहे.भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ.लाखन सिंग यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिकांचे वाण, बिजोत्पादन व प्रात्यक्षिकांना भेट देवून शेतकºयांना या प्रात्यक्षिकांचा निश्चितच फायदा होईल, याबद्दल मत व्यक्त केले. तसेच प्रक्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिकांची प्रशंसा केली.डॉ.अंकुश कांबळे म्हणाले, धुळे कृषि विज्ञान केंद्राने यशोगाथा तयार केल्या, त्यांचे प्रिंट, व्हिडिओ, आॅडियो इत्यादीच्या माध्यमातून दस्ताऐवजीकरण करणे तितकेच गरजेचे आहे. तसेच शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्याकरिता त्यांचा निविष्ठांवर होणारा खर्च कमी होणे गरजेचे आहे, जेणेकरून एकुण उत्पादन खर्च कमी केला जावू शकतो.प्रास्ताविक डॉ.दिनेश नांद्रे यांनी केले. शास्त्रज्ञ जगदिश काथेपुरी यांनी कृषिविद्या, रोहित कडू यांनी उद्यानविद्या, डॉ.पंकज पाटील यांनी पिक संरक्षण, अमृता राऊत यांनी कृषि प्रक्रिया, डॉ.अतिष पाटील यांनी मृद शास्त्र आणि कृषि रसायन, डॉ. धनराज चौधरी यांनी पशु शास्त्र आणि दुग्ध शास्त्र, जयराम गावित यांनी प्रक्षेत्र व्यवस्थापन आणि स्वप्नाली कौटे यांनी संगणक याविषयी सादरीकरण केले.‘रब्बी ज्वारी उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान’, ‘जमिन सुपीकतेसाठी सेंद्रीय कर्बाचे व्यवस्थापन’ आणि ‘मका पिकातील अमेरीकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन’ या तीन घडीपत्रिकेचे बैठकीदरम्यान विमोचन करण्यात आले. प्रक्षेत्र भेटी दरम्यान सर्व मान्यवरांनी धुळे कृषि विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक कक्षांना भेट देवून पाहणी केली. तसेच विविध कक्षांच्या नुतनीकरणांसाठी सुचना दिल्या. बैठकीसाठी स्वप्नील महाजन, बाळू वाघ, रमेश शिंदे, कुमार भोये, मधुसुदन अहिरे, यशवंत मासुळे, जीवन राणे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे