शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर शिंदखेड्याचे राजकारण पाण्याभोवतीच फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:23 IST

शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक; राजकीय हालचालींना वेग : सत्ता द्या; पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे मतदारांना आश्वासन

ठळक मुद्देअवघ्या काही दिवसांवर शिंदखेडा नगरपंचायत येऊन ठेपल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपाची राजकीय सूत्र लालचंद नगर येथील अनिल वानखेडे यांचे निवासस्थान व स्टेशनरोडवरील भाजपा कार्यालय येथून हालत आहे.तर कॉँग्रेसतर्फे निवडणुकी संदर्भातील राजकीय रणनिती व धोरणात्मक निर्णय हे प्रा. सुरेश देसले यांच्या शिवाजी चौकातील निवासस्थानी चर्चा करून घेतले जात आहेत. शिवाजी चौकातच शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे.शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते पक्ष कार्यालयात येऊन त्यांची निवडणुकीतील रणनिती ठरवत आहेत. तर समाजवादी पार्टीच्या राजकीय हालचाली या विजयसिंग राजपूत यांच्या रथगल्ली येथील निवासस्थानी चर्चा केल्यानंतर गतिमान होत असल्याचे एकंदरीत शिंदखेडा शहरात चित्र दिसून ये

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका अशी पूर्वापार ओळख आहे. ही ओळख अजूनही पुसली गेलेली नाही. शिंदखेडा शहरापुरता विचार केला तर येथील ग्रामपंचायत ते नगरपंचायतीत आजपर्यंत ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला; त्यांनाही शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. येवढेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर येथील राजकारण्यांचे राजकारण हे केवळ पाण्याभोवतीच फिरत राहिले; असे येथील जाणकार सांगतात. आता तर सत्ता द्या, पाणी पुरवठा योजना मार्गी लावूनच दाखवू, असे जनतेला आश्वासित केले जात असल्याचा प्रयत्न शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींकडून दिला जातो आहे. त्यामुळेच भाजपात केला प्रवेश भाजपात प्रवेश करणारे अनिल वानखेडे यांनी कॉँग्रेस व देसले गटातील गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश करण्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचे भाजपात येण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भाजपात मंत्री जयकुमार रावल यांनी  पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू,असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला आणि प्रत्यक्षात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळेच भाजपात ते आले आहे.  

पाणीपुरवठा योजनेसाठी दिली लोकवर्गणी कॉँग्रेसचे प्रा. सुरेश देसले म्हणाले, की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता मिळाली. त्यानंतर पाच वर्षात शहर विकासासाठी  ६० टक्के काम के ल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर त्यासाठी शासनाने ५ टक्के लोकवर्गणीची अट घातली होती. त्यानुसार शिंदखेडा नगरपंचायतीला १३ व १४ व्या वित्त आयोगाचा मिळालेल्या निधीचे पैसे हे लोकवर्गणीसाठी दिले होते. त्यामुळे काही कामे ही राहून गेली, असे प्रा. देसले यांनी म्हटले आहे.  मात्र, येत्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे ते म्हणाले आहे.  

शिवसेना १ डिसेंबरला जाहीर करणार जाहीरनामा शिंदखेडा नगरपंचायतीत शिवसेनेनेही १२ उमेदवार व १ नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराची धूरा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्यावर असून शिवसेना पक्षाचा जाहीरनामा १ डिसेंबरला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे. परंतु, जाहीनाम्यावर  पाणी प्रश्न हा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

समाजवादी पार्टीतर्फे दिला जातोय विकासाचा नारा शिंदखेडा नगरपंचायतीत समाजवादी पार्टीतर्फे विकासाचा नारा दिला जातो आहे. स.पा.चे उमेदवार मतदारांना रस्ते, पाण्याचा निचरा व इतर विकासात्मक कामे करणार असल्याचे आश्वासन देत आहेत; तर या निवडणुकीत स.पा.ने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहे. त्यापैकी १० जागा व १ नगराध्यक्षपदी आमचा उमेदवारच निवडून येईल, असा विश्वास समाजवादी पार्टीचे विजय नथेसिंह राजपूत यांनी व्यक्त केला  आहे. 

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; गृहभेटीदरम्यान ‘पाणी पे’ चर्चा

शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शहराचा बिकट पाणी प्रश्न विचारात घेता, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून २१ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. सद्य:स्थितीत या योजनेंतर्गत शिंदखेडा शहरापासून ९ कि.मी. अंततरावर सुकवद येथील तापी नदीचे पात्रातून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाजपाचे अनिल वानखेडे हे सत्ता आल्यानंतर ही योजना प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रचारादरम्यान सांगताना दिसत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता विविध पक्षांचे उमेदवार हे गृहभेटींवर अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. उमेदवार प्रचारासाठी मतदारांच्या घरी गेल्यानंतर केवळ ‘पाणी पे’ चर्चा अधिक रंगत आहे. मतदार उमेदवारांना या निवडणुकीनंतर तरी शहराचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी विनंती करताना दिसत आहे. मतदारांना उत्तर देताना  ‘फक्त सत्ता द्या, हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताना दिसत आहे.