शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मनपात सभापती निवडीनंतर जल्लोष!

By admin | Updated: January 16, 2017 23:59 IST

सभापती : स्थायी- कैलास चौधरी, महिला व बालकल्याण - इंदूबाई वाघ, राष्ट्रवादीचे यश

धुळे : महापालिका स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदी चंद्रकला जाधव यांची निवड झाली़ सभापती निवडीनंतर मनपात फटाक्यांच्या आतषबाजीसह एकच जल्लोष करण्यात आला़ तीनही पदांवर निवड झालेले सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत़ दरम्यान, नूतन सभापती लवकरच पदभार स्वीकारणार आहेत़हात उंचावून मतदानमनपा स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली़ या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आयुक्त संगीता धायगुडे, निवडणूक निर्णय उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी व प्ऱनगरसचिव मनोज वाघ उपस्थित होत़े  स्थायी सभापती निवड प्रक्रियेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली़ या पदासाठी विहित मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कैलास चौधरी, तर भाजप-सेना युतीतर्फे वालीबेन मंडोरे यांचे अर्ज प्राप्त झाले होत़े त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया झाली व त्यात दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आल़े अर्जावर हरकत घेण्यासाठी वेळ देण्यात आला. मात्र या अर्जावर कुणीही हरकत घेतली नाही़ त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला़ मात्र कुणीही माघार न घेतल्याने 11़30 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली़  या वेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केल़े यात कैलास चौधरी यांना 13, तर वालीबेन मंडोरे यांना 3 मते मिळाली़ सर्वाधिक मते मिळाल्याने सभापतीपदी कैलास चौधरी यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी जाहीर केल़े निवडणुकीत कैलास चौधरी यांच्या बाजूने स्वत: त्यांच्यासह कमलेश देवरे, दीपक शेलार, नाना मोरे, गुलाब महाजन, साबीर सैयद, इस्माईल पठाण, चित्रा दुसाने, मायादेवी परदेशी, ललिता आघाव, जैबन्निसा पठाण, यमुनाबाई जाधव, हाजराबी शेख यांनी मतदान केले, तर वालीबेन मंडोरे यांच्या बाजूने स्वत: त्यांच्यासह शिवसेना गटनेते संजय गुजराथी, ज्योत्स्ना पाटील यांनी मतदान केल़े सभापतीपदी कैलास चौधरी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व आयुक्त संगीता धायगुडे यांनी सभापतींचा सत्कार केला़ त्यानंतर मनपा आवारात समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी एकच जल्लोष केला़ त्यानंतर सजविलेल्या वाहनातून नूतन सभापतींची मिरवणूक काढण्यात आली़ या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष मनोज मोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, यशवर्धन कदमबांडे, सभागृह नेते कमलेश देवरे, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होत़े महिला बालकल्याण सभापती, उपसभापतींची निवडमहिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीला दुपारी 1 वाजता सुरुवात झाली़ सभापतीपदासाठी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदासाठी चंद्रकला जाधव यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले होत़े छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आल़े त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला़ अखेर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सभापतीपदी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदी  चंद्रकला जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचा सत्कार केला़ त्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला़