शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मालनगावचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:09 IST

शेतक-यांना  दिलासा : रब्बी पिकांसाठी पाण्याची होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने पाटचारी तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना रब्बी हंगामासाठी पाणी पुरवण्याची मागणी केली होती़ त्याबाबतचे वृत्त लोकमत मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने अखेर पाटचारीतून पाणी सोडले आहे़ साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरात असलेले मालनगाव धरण ४०० दलघफू क्षमतेचे आहे़  १९८९ साली १९२० हेक्टर क्षेत्र २२०० लाभार्थी  शेतकरी व १६ गावांमधील ५० हजार लोकवस्तीसह या भागातील अर्थव्यवस्था या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ मालनगाव, खरडबारी, वर्जेपाडा, खांडबारा, झिरणीपाडा, सातरपाडा, बोडकीखडी, दहिवेल, भोनगाव, कालदर, बोदगाव, शिरवाडे, आमोडे, किरवाडे, घोडदे, सुरपान, छडवेल, अष्टाणे, कावठे या गावांमधील खरीप पिके ही २५ किमी लांब पाटचारीतील पाण्यावर अवलंबून आहे़ मालनगाव धरणाची पाटचारी नादुरूस्त झाल्याने पाटचारीत पाणी सोडण्यास अडचण निर्माण झाली होती़ मालनगाव धरण बचाव संघर्ष समिती आमदार डी़एस़ अहिरे यांनी पाटबंधारे प्रशासनाकडे पाठपुरावा करून जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले व दिड महिन्यात पाटचारी दुरूस्त करण्यात आली़ ‘लोकमत’ने पाटचारी दुरूस्त व्हावी व शेतकºयांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्याच्या मागणीसंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी सोडले़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ शेतकºयांनी रब्बी पिकांसाठी पाणी अर्ज भरावे, असे आवाहन करण्यात आले़ 

टॅग्स :Dhuleधुळे