शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात १४ तासानंतर ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:47 IST

देखाव्यांनी लक्ष वेधले, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ठळक मुद्देमंडळांनी केला पारंपारिक वाद्याचा वापरदेखाव्यांनी लक्ष वेधलेशांततेत पार पडली मिरवणूक

आॅनलाइन लोकमतधुळे- येथे ‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगलमय वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ही विसर्जन मिरवणूक तब्बल १४ तास सुरू होती. गणेश चतुर्थीला जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. अनंत चतुर्दशीला जिल्हयातील २८५ सार्वजनिक तर ३७ खाजगी मंडळांच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. धुळ्यात १४९ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीच्या अग्रभागी जुन्या धुळ्यातील  मानाचा खुनी गणपती होता. या मंडळाची मिरवणूक दुपारी २ वाजता सुरू झाली. सजविलेल्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही मिरवणूक खुनी मशीदीजवळ पोहचली. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मानाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर मोठ्या मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. यावेळी सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्याचा वापर केला. काही मंडळांनी सजीव देखावे केले होते. हे देखावे लक्षवेधक ठरले होते.  रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेवटच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

टॅग्स :Dhuleधुळे