शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोना काळात जार नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST

धुळे - जिल्ह्यत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे बहुतेक ...

धुळे - जिल्ह्यत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे बहुतेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. याचा फटका जर विक्रेत्यांनाही बसला आहे. अनेकांनी जार बंद केल्याने शहरातील जार विक्रीची संख्या घटली आहे.

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या या लाटेत जास्त आहे, तसेच ६० पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बाहेरील वस्तू घेण्यास ते नकार देत आहेत, तसेच ज्यांच्याकडे नियमित जार येत होते त्यांनीही सुरक्षिततेच्या कारणामुळे जार बंद केले आहेत. त्यामुळे जार विक्रेत्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. शहरात परवानाधारक जार विक्रेते किती आहेत याबाबत विविध यंत्रणांमध्ये संभ्रम आहे. केवळ १० जारधारकांकडे परवाने असल्याची माहिती मिळाली.

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे लग्न समारंभ व इतर कार्यक्रम बंद होते, तसेच यंदाच्या लगीन सराईच्या तोंडावर कोरोनाचा उद्रेक झाल्याने समारंभांवर बंधने आली आहेत. अशा कार्यक्रमात जार पुरविणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत घरोघरी नियमित जारचा पुरवठा करणारे विक्रेते कमी आहेत. मात्र, त्यातही अनेकांनी जार बंद केल्याने विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

देवपूरमध्ये सर्वाधिक प्रकल्प -

शहरात सर्वाधिक पाण्याचे जारचे प्रकल्प देवपूर भागात आहेत. तेथून ते देवपूर व धुळे शहरातही जारचा पुरवठा करतात, तसेच देवपूरमध्येही जारचा पुरवठा करतात. प्रकल्पाच्या ठिकाणी जार घ्यायला येणाऱ्या ग्राहकांकडून ५ ते १० रुपये कमी घेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पालिकेकडे १० प्रकल्पांची नोंद -

धुळे शहरात १०० पेक्षा जास्त पाण्याचे जारचे प्रकल्प आहेत. त्यामध्ये परवानाधारक विक्रेत्यांची संख्या कमी आहे. केवळ १० विक्रेत्यांकडे परवाना असल्याची माहिती मिळाली. जार प्रकल्पासाठी आधी नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागत होती. आता मात्र तो नियम रद्द झाल्याची माहिती मिळाली. परवानगीची प्रक्रिया सोपी झाल्याचेही सांगण्यात आले. आता जार प्रकल्पासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, एकूण प्रकल्पांच्या तुलनेत परवानगी असलेल्या विक्रेत्यांची संख्या अतिशय अल्प आहे.

प्रतिक्रिया

बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. घरात वयोवृद्ध आई-वडील असल्याने अधिक काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे बंद केले आहे, तसेच बाहेरून वस्तू घेणे टाळत आहोत. त्यामुळे पाण्याचा जारही बंद केला आहे.

- प्रवीण चौधरी, धुळे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत आहोत, तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळत आहोत. पाण्याचा जार घेऊन येणारी व्यक्ती किती काळजी घेते त्याबाबत माहिती नसल्याने सध्या पाण्याचा जार घेणे बंद केले आहे.

- चेतन सूर्यवंशी, धुळे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मागील वर्षांपासून हंगाम पूर्णपणे बुडाला आहे. कोरोनाच्या आधी व्यवसाय चांगला सुरू होता. त्यानंतर मात्र सतत नुकसान होत आहे. लग्न समारंभ व तापमान वाढीमुळे उन्हाळ्यात जारची अधिक विक्री होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मोठ्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत, तसेच नियमित जार घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे.

- पाणी विक्रेता, देवपूर

मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी जारची विक्री - १२ हजार

मार्च २०२० मध्ये दररोज होणारी जारची विक्री - ६ हजार ५००

मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी जारची विक्री - ३ हजार ५००

-७० टक्के

- २०२१ मध्ये घटली जारची विक्री