शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीला प्रशासकीय मंजुरी!

By admin | Updated: January 26, 2017 02:05 IST

महापालिका : लेखा विभागाच्या आक्षेपामुळे स्थायीतील ठरावानंतर दीड महिन्याने मार्ग मोकळा

धुळे : महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधे संपली असल्याची ओरड वारंवार झाल्यानंतर चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून औषध खरेदीचे काम मार्गी लावण्यात आल़े मात्र या प्रक्रियेला प्रशासकीय मंजुरी नसल्याचा आक्षेप लेखा विभागाने घेतल्याने दीड महिन्यापासून रखडलेल्या औषध खरेदीचा मार्ग अखेर बुधवारी मोकळा झाला़ मनपाचे 10 अॅलोपॅथी दवाखाने, 2 सूतिकागृह, एका कुटुंब कल्याण केंद्रासाठी 2016-17 या वर्षासाठी लागणा:या औषध खरेदीसाठी तीन वेळा निविदा मागविण्यात येऊनही प्रतिसाद न लाभल्याने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया पार पडली होती़ त्यानुसार प्राप्त निविदा दरांना 8 डिसेंबरला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली़ स्थायी समितीने शासकीय दरापेक्षा कमी दराने 83 प्रकारची औषधे खरेदीची निविदा मंजूर केली आह़े या औषधींसाठी 55 लाख 5 हजार 935 रुपयांचा खर्च अपेक्षित आह़े दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत औषधांचा विषय मंजूर झाल्यानंतर तो लेखा विभागाकडे गेला असता मुख्य लेखापरीक्षकांनी औषध खरेदीस प्रशासकीय मंजुरी नसल्याचा आक्षेप घेतला होता़ त्यामुळे प्रशासकीय मंजुरीसाठी औषध खरेदीची फाईल उपायुक्त व सहायक आयुक्तांकडे गेली़ मात्र स्वच्छ सव्रेक्षण अंमलबजावणी, केंद्रीय व राज्य समितीचा दौरा, नाशिक पदवीधर निवडणुकीची जबाबदारी यामुळे संबंधित अधिकारी व्यस्त असल्याने औषध खरेदीची फाईल पडून होती़ आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर औषध खरेदीला तब्बल दीड महिन्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्याबाबतची कार्यालयीन टिपणी आयुक्तांना सादर केली जाणार आह़े त्यानंतर औषधे मागविली जातील़ मनपा दवाखान्यांमध्ये तीन ते चार  महिन्यांपासून औषधे संपली असल्याने तात्पुरती औषधे मागवून आरोग्य विभागाला काम पाहावे लागत होत़े