लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळेतील नॉन पेसा वर्ग तीन व वर्ग चारच्या तासिका व रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाºयांना नियमित सेवेत समायोजित करण्यात यावे, ३ मार्चपर्यंत दखल न घेतल्यास ५ मार्चपासून नाशिक आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दीपक चौधरी, रवींद्र गोसावी, युवराज चव्हाण, सिंधु भिल, अनिता मालचे, प्रमोद पाटील या कर्मचाºयांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, धुळे जिल्हा पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, आयुक्त व सर्वच प्रकल्प अधिकारी यांना पाठविल्या आहेत.रोजंदारी तत्त्वावर गेली अनेक वर्षे अतिदुर्गम भागात अत्यल्प मानधनावर रिक्त पदांवर त्या पदांना आवश्यक शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता धारण केलेले कर्मचारी कार्यरत आहेत. वयाची शासन मर्यादा ओलांडलेली आहे. वेळोवेळी मागणी करुन तसेच पदयात्रा, बिºहाड मोर्चे आंदोलन करुन देखील न्याय मिळत नसून केवळ आश्वासन मिळत आहे.शासनाने केवळ पेसाअंतर्गंत विशेष बाब भरती प्रक्रिया राबविली. सदर भरती प्रक्रियेतील निकषामुळे अनेक वर्षांपासून अनुभवी कर्मचाºयांच्या हाती निराशाच आली. त्यांना सेवाबाह्य होण्याची वेळ आली. जर इतर विभागामध्ये एकवेळची बाब म्हणून असे कर्मचारी नियमित केले जातात तर आपल्या विभागाचेच धोरण या कर्मचाºयांच्या विरोधात का, असा सवाल कर्मचाºयांनी उपस्थित केला आहे. धोरणात्मक निर्णय घेऊन कर्मचाºयांना न्याय द्यावा, सदर कर्मचाºयांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी सेवा सुरक्षा देण्यात यावी. पेसा क्षेत्रातील नियमित नॉनपेसा कर्मचाºयांना नॉनपेसा क्षेत्रात पदस्थापना करण्यात येवू नये. विशेष बाब भरती प्रक्रियेत अपात्र पेसा कर्मचाºयांचेही समायोजन करण्यात यावे. वर्ग ४ कर्मचाºयांसाठी अन्यायकारक सेंट्रल किचन व बाह्य स्त्रोताद्वारेची ठेका पध्दत बंद करण्यात यावी.विशेष बाब भरती प्रक्रियेतील समकक्ष पदाचा अनुभव, ही अन्यायकारक अट रद्द करून कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तासिका व रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:05 IST