शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीनंतरही धुळे जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: June 10, 2017 13:31 IST

दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली

ऑनलाईन लोकमत / राम निकुंभ  धुळे, दि. 10 - राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दोन महिन्यात अपघातांची संख्या जैसे थे असून त्यात मृत्यूमुखी पडणा:या किंवा जखमींच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 1 एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वेगात, निष्काळजीपणे वाहने चालविणे, अवघड वळणे या कारणाबरोबरच वाहनचालकांकडून मद्यसेवन करून वाहने चालविण्यामुळे अपघात होत असतात. महामार्गावर सहज मद्य उपलब्ध होत असल्याने हे अपघात होत असल्याचे मानले जात होते.त्यामुळे महामार्गावरील परमीट रूम, दारू दुकानांमधून सहज मद्य उपलब्ध होऊ नये, म्हणून महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरावरील दारू विक्री बंद झाली आहे. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील 260 दारू दुकाने बंद झाली आहेत.  त्यात 40 देशी दारू दुकाने, 13 वाईप शॉप, 146 परवाना कक्ष, 61 बिअर शॉपी अशा एकूण 260 दारू दुकानांचा समावेश आह़े जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. सुरत-नागपूर, मुंबई-आग्रा, धुळे-सोलापूर,  अंकलेश्वर-बु:हाणपूर असे महामार्ग जिल्ह्यातून जातात. या मार्गावरील अपघातात वर्षाला 350हून अधिक जणांचा मृत्यू होतो. या महामार्गावरच सर्वाधिक दारू दुकाने होती. महामार्गावरील दारूबंदीनंतर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अपघातांची माहिती घेतली असता, अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे आढळून आले.एप्रिल महिन्यांत प्राणघातक 22 अपघात झाले असून त्यात 25 जणांना जीव गमवावा लागला, 14 गंभीर अपघात होऊन 54 जण गंभीर जखमी झाल़े मे महिन्यात 19 अपघातात 28 जणांचा मृत्यू, तर 21 गंभीर अपघातात 54 जण गंभीर जखमी झाले. दोन्ही महिन्यात 26 किरकोळ अपघातात 74 जखमी झाले आहे.महामार्गावरील दारूबंदी लागू होण्यापूर्वी मार्च महिन्यात 17 प्राणघातक अपघात होऊन 20 जण ठार, तर 8 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात 13 अपघातात 14 ठार, तर 14 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होत़बेकादेशीर दारूविक्री रोखण्याची गरज महामार्गावर दारूबंदी असली, तरी हॉटेल्स व धाब्यांवर सहज दारू उपलब्ध होत आहे. पोलिसांनी केलेल्या हॉटेलमधील छाप्यांवरूनही ही बाबसमोर येत आहे.  बेकायदेशीर दारू विक्री रोखल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. अपेक्षा फोल कारण नेमके काय?फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल-मे महिन्यांच्या या तुलनेनुसार प्राणघातक  अपघातांची संख्या या कालावधीत सारखीच 30 एवढी असली तरी मृतांच्या संख्येत मात्र दारूबंदीनंतर 34 वरून 53 अशी दीडपट वाढ झाली आहे. गंभीर अपघातांची संख्या 22 वरून 35 अशी वाढली असून जखमींच्या प्रमाणातही 56 वरून 108 अशी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ अपघात मात्र दारूबंदीनंतर 31 ऐवजी 26 असे घटले आहेत. याऊलट जखमींच्या संख्येत मात्र पुन्हा 60 वरून 74 अशी सव्वा पट वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पाहता दारूबंदीनंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अपघातांची संख्या घटेल व प्राणहानी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे मात्र एप्रिल व मे महिन्यात असलेल्या सुटय़ा व लगAसराईच्या हंगामामुळेसुद्धा वाहतुकीत वाढ होऊन अपघातांची संख्या वाढल्याचे कारण देण्यात येत आहे.