धुळे : तंबाखू, गुटखा, सिगारेटमुळे कॅन्सर होत असल्याने या उत्पादनांच्या विक्रीवर शासनाने बंदी घातली असतांना देखील सरार्सपणे विक्री करणाऱ्या १६ विक्रेत्यांवर तंबाखू नियंत्रणासाठी नेमलेल्या भरारी पथकाने कारवाई करून सुमारे ४ हजार ७२३ रूपयांची वसुली केली़महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू, सुपारी, पानमसाला व गुटख्याचे उत्पादन , विक्री, साठवणूक, वाहतूक व वितरणावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही या प्रतिबंधित वस्तूंची राजरोसपणे विक्री होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती़ त्यानुसार आग्रारोड, मच्छीबाजार, बाजारपेठ परिसर अशा १६ ठिकाणी छापा टाकुन पाच हजार रूपये दंड विक्रेत्यांना ठोठावण्यात आला होता़ तंबाखू नियंत्रण पथकांकडून शहरातील विविध भागातील विक्रेत्यांची गुप्तपणे माहिती घेतली जात असून त्यानुसार कारवाई केली जात आहे़
भरारी पथकातर्फे १६ विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:01 IST