शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

अपघातामुळे ‘अर्ध्यावरती डाव मोडला़ अधुरी एक कहानी़’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:20 IST

गावापासुन अवघ्या एक किलोमिटर अंतरावर काळाची झडप

लोकमत न्यूज नेटवर्कनिमगुळ :  शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील मनीषा बागल(३२) व पती महेश बागल (३५) हे बहिणीच्या सासºयांचा  दशक्रिया विधी आटोपून गावाकडे परतत असताना.अवघ्या  एक किलोमीटर अंतरावर गाव बाकी राहिले असताना. झालेल्या भीषण अपघातात मनीषा बागल यांच्या वर काळाने झडप घातली. त्यांच्या संसाराचे क्षणार्धात  होत्याचे न व्हते झाले.पती महेश बागल याना देखील गंभीर दुखापत झाली असून हाताला फ्रॅक्चर व कंबरेला मुका मार बसला आहे. ते थोडक्यात बचावले असले तरी संसाराची अर्धांगिनी दगावल्याने त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली आहे.मनीषा बागल यांच्या सासरची घरची परिस्थिती तशी बेताची कोरडवाहु दोन बिघे जमीन. सासरे दोन्ही पायांनी अपंग या परिस्थितीत मनीषा बागल या पती महेश बागल यांना संसारात शेतीच्या कामात सक्रिय साथ देत होत्या.मनीषा बागल या  आय.टी.आय. झालेल्या पती महेश याचं शिक्षण तस कमी मात्र आपल्या घरच्या मंडळींना आपल्या शिक्षणाचा कधीच कमी पणा त्यांनी  जाणवू दिला नाही.शिक्षण असून ही घरातील शेतीत रमल्या मात्र नियतीला हे पाहवले नाही. मोठा मुलगा शुभम वय ९ वर्ष तर लहान मुलगा यश ७ वर्ष दोन्ही मुले चांगले शिकून मोठे व्हावे. यासाठी घरची  बेताची परिस्थिती असून ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्याची धडपड आज स्वप्नवत सोडून मनीषा यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने आज गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत.या दोन्ही लहान मुलांची आई मनीषा गावाला जाऊन येते म्हणून सांगून गेली आणि आता त्या कधीच परत येणार या चिमुकल्यांचा प्रश्नाचं उत्तर कुणाचं कडे नाही. मनीषा यांचे भाऊ मनोहर सैदाणे हे धडगाव येथे कृषी खात्यात नोकरीस आहेत. भावांची बहिणीला वेळोवेळी मदत होती. आज माहेरी देखील दु:खाचा कोलाहल आहे. मनीषा बागल यांच्या अकाली जाण्याने गावावर शोककळा पसरली असून त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील सर्व लहान मोठे उद्योग बंद ठेवण्यात आले होते. शोकाकुल वातावरनात दुपारी ४ वाजेला त्यांच्यावर मोठ्या जनसमुदायात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे