शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:40 IST

धुळ्यात कारवाई : वार ग्रा.पं.ला दिलेल्या अनामत रकमेसाठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सरपंच म्हणून तालुक्यातील वार ग्रामपंचायतीत सरपंच असताना विकासकामासाठी दिलेली दीड लाख  रुपये अनामत रक्कम परत देण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील वार येथील ग्रामसेवक राजाराम बारकू सांगळे (४३) याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे २००८ ते २०१२ पर्यंत वार ग्रा.पं.मध्ये सरपंच म्हणून कार्यरत होते. २०११-१२ मध्ये विकास कामासाठी तक्रारदार यांनी १ लाख ४८ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून दिले होते.  ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी अर्ज केले. परंतु रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी येथील गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे गटविकास अधिकाºयांनी वार सरपंच व ग्रामसेवक यांना त्यांची रक्कम परत देण्याबाबत पत्र दिले. तक्रारदार ग्रामसेवक सांगळे याला भेटले. त्याने अनामत रकमेसाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवार ७ रोजी तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केली असता ग्रामसेवक सांगळे याने लाचेची मागणी केल्याचे प्रत्ययास आले. त्यानुषंगाने सांगळे याने तक्रारदार यांना येथील मालेगाव रोड, रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेल सुपर सम्राट येथे बोलवून ५० हजार रुपये स्वीकारल्याने त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी