शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस २० वर्षांनंतर अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:21 IST

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत १९९९ मध्ये झाला होता खून  

लोकमत आॅनलाईन धुळे : पिंंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील युवकाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीस तब्बल २० वर्षे ४ महिने १२ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. विजय उर्फ पिन्ट्या प्रल्हाद पाटील (४१), रा.चिकसे, ता.साक्री असे या आरोपीचे नाव आहे. नारायण सुकदेव पाटील, रा.चिकसे, ता.साक्री यांनी त्यांचा मुलगा दीपक नारायण पाटील (१७) याचा निर्घृणपणे खून झाल्या प्रकरणी पिंंपळनेर पोलिसांत चार आरोपींविरूद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं १/१९९९, भादंवि कलम ३०२,३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय उर्फ पिन्ट्या हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या वास्तव्याची माहिती मिळत नव्हती. त्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. पण प्रयत्न सुरूच होते. त्यानुसार तो सध्या सुरत शहरात राहत असल्याचे समजले. तेथे जाऊन शोध घेतला. पण आरोपी चतूर असल्याने तो वेळोवेळी त्याचा राहण्याचा व व्यवसायाचा ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व लपवित होता. परंतु २८ रोजी विजय उर्फ पिन्ट्या हा साक्री येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.जे.राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण अमृतकर, सुरेश बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल मोहने, प्रभाकर सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साक्री बसस्थानक परिसरात दबा धरून बसले. त्याचवेळी विजय तेथे येताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले. तो रामपार्क सोसायटी, प्लॉट नं.२१४, नवागाव दिडोली, सुरत (गुजरात) यास खात्री करून अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी