शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा विकास कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:54 IST

साक्री : निजामपूर येथील म्हसाई माता ट्रस्ट येथे उद्घाटन

साक्री : डोंगरी शाळेतील शिक्षणानंतर दऱ्या-खोºयातील आदिवासी विद्यार्थी महू फुलांची विक्री करून मिळालेल्या पैशाने उच्चशिक्षण घेण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने शहराकडे आला. महू फुलांचा उपयोग कोणी मद्यासाठी करत असेल. मात्र, अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी याचा उपयोग आत्मविश्वास आणि प्रेरणेसाठी केला, असे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मोहन पावरा यांनी केले.साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत निजामपूर येथील म्हसाई माता ट्रस्ट येथे आयोजित विद्यापीठस्तरीय तीन दिवशीय ‘आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा विकास’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मोहन पावरा, उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, डॉ.शशीकांत बोरसे, सिनेट सदस्य प्रा.संजय सोनवणे, निजामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार, नंदुरबार बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.हसीम शेख, जगदीश शाह, ईश्वर सोनवणे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, डॉ.सचिन नांद्रे, डॉ.संजय खोडके, प्रा.डी.एल. पाटील, रघुवीर खारकर, कार्यशाळा समन्वयक डॉ.लहू पवार आदी उपस्थित होते.पावरा पुढे म्हणाले की, पूर्वी जल, जंगल, जमीन, जनावरे सारख्या संस्कृतीची जोपासना करणारा आदिवासी विद्यार्थी लाजरा होता म्हणून शहरातील शाळा-महाविद्यालयांकडे जाण्यास घाबरत होता. त्यांना आता शहराच्या शाळांची वाट सापडली आणि अशा कार्यशाळांमुळे निश्चितच अजून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते भविष्यात उत्तुंग भरारी घेतील, असे सांगितले. डॉ.शशिकांत बोरसे यांनी समाजातील विविध उदाहरणे देऊन आत्मविश्वास आणि प्रेरणा कशी मिळते, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार यांनी आदिवासी विद्यार्थी प्रयत्नवादी असल्याचे सांगितले. रघुवीर खारकर, प्रा.हसीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.लहू पवार, सुत्रसंचलन डॉ.ज्योती वाकोडे, आभार प्रदर्शन प्रा.भूषण अहिरराव यांनी केले. कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, डॉ.ए.पी. निकम, डॉ.प्रदीप राठोड, प्रा.विश्वास भामरे, विद्यार्थी प्रतिनिधी अजय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे