शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:23 IST

लाडक्या लेकींना माहेरी आनंदाच्या चार क्षणांसाठी या सणाला महत्त्व 

ठळक मुद्देखान्देशात आखाजी सासुरवाशिणींचा सण घागर पुजून केले जाते पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी त्यासाठी आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत

 

प्रदीप पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : खान्देशात आखाजी अर्थात अक्षय तृतीया हा सासुरवाशीणींचा सण समजला जातो. सासरी गेलेल्या लेकी सणासाठी माहेरी परतात. यामुळे परिवारात आनंदी वातावरण असते. लाडक्या लेकींना माहेरी आनंदाचे चार क्षण मिळावे यासाठी आखाजी सणाला विशेष महत्व आहे.अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेऊन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोºया, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासून आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरील पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रेट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत, कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेऊन, विसावा घेऊन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.चैत्र वैशाखाचं उन्हं वं मायवैशाखाचं उन्हंखडक तापुन लाल झाले वं मायतापुन झाले लालआईच्या पायी आले फोड वं मायपायी आले फोडआईची बेगडी वाव्हन वं मायबेगडी वाव्हनतठे काय कन्हेरानं झाड वं मायकन्हेरानं झाडमाहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाºया टाकल्या जातात.. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वंझुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वंझुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वंमाय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजोबन्धु हातमा दी ठेवजो ली ठेवजोबन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्यानाआथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वंझोके घेत मुली गाण्यातून आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.वाटवर हिरकनी खंदी वं मायसंकर राजानी खंदी वं मायवाटवर जाई कोनी लाई वं मायसंकर राजानी लाई वं मायजाईले पानी कोनी घालं वं मायसंकर राजानी घालं वं मायजाईले फुल कोनी आनं वं मायसंकर रानाजी आनं वं मायगौराईना गयामां माय कोनी घाली वं मायसंकर राजानी घाली वं माय

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया