शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली देवपुरातील भरवस्तीत रात्रीची घटना, दोघांवर गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: April 8, 2023 19:10 IST

या प्रकरणी शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

धुळे - दवाखान्यातून घरी परत जात असताना कोणीही नसल्याची संधी साधून दुचाकीने भरधाव वेगाने आलेल्या दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडून घेतली. ही घटना देवपुरातील क्षिरे काॅलनीत गुुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. वाडीभोकर रोडवरील क्षिरे कॉलनीत राहणाऱ्या प्रियंका धीरज छाजेड (वय ३५) या महिलेने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दाखल केली.

गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास प्रियंका छाजेड ही महिला दवाखान्यात गेली होती. तेथून घरी परतत असताना मोटारसायकलने दोन तरुण पाठलाग करीत आले. रस्त्यावर कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने गळ्यातील सोनपोत ओरबाडून घेतली. मानेला झटका बसताच प्रियंका यांनी आरडाओरड केली. पण, रात्रीची वेळ असल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही. तोपर्यंत दोन अनोळखी तरुणांनी पोबारा केला.

१४ ग्रॅम वजनाची ४२ हजार रुपये किमतीची सोनपोत चोरट्यांनी लांबविली. या घटनेनंतर महिला घाबरली. घरी जाऊन त्यांनी हा सर्व प्रकार घरच्या लोकांना सांगितला. स्वत:ला सावरत त्यांनी शुक्रवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोन अनोळखी तरुणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.