शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला वाचवण्याच्या नादात दुचाकीने दोघांना उडविले; गंभीर जखमीचा मृत्यू

By देवेंद्र पाठक | Updated: January 29, 2024 18:10 IST

वायपूर ते खलाणे रोडवरील घटना, उपचार घेताना मृत्यू

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वायपूर ते खलाणे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात पायी जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. त्यातील एक गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना मृत्यू झाला. इच्छाराम नारण छावणी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

राकीबूल शेख मिनारूल यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील इच्छाराम नारण छावणी (वय २३, रा. छावणी निवास, जि. बानकुडा, पश्चिम बंगाल) आणि राकीबूल शेख मिनारूल हे दोघे शिंदखेडा तालुक्यातील वायपूर गावाकडून खलाणे गावाकडे रस्त्याने १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्याच वेळेस एमएच १९ इबी ९३३५ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने आली आणि पायी चालत जात असणारे इच्छाराम नारण छावणी आणि राकीबूल शेख मिनारूल या दोघांना दुचाकीची धडक बसली. यात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्यासह हाता पायाला त्यांना दुखापत झाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना इच्छाराम नारण छावणी यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. राकीबूल शेख मिनारूल यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद रविवारी करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे