शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ९४ हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 16:52 IST

बसची वाट पाहत असतानाच चोरट्याने तिच्याजवळ येऊन तिच्या बॅगमधून पर्स लांबविली.

राजेंद्र शर्माधुळे - एका महिलेच्या बॅगमधील पर्समधून चोरट्याने शिताफीने हातसफाई करत रोख रकमेसह दागिने असा ९४ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी भरदुपारी धुळे बस स्थानकावर घडली. याप्रकरणी सायंकाळी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कजवाडी येथील भारती नीलेश शेवाळे (वय ३०) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भारती शेवाळे ही महिला धुळे बसस्थानकाच्या आवारात असताना चोरट्याने तिला हेरले.

बसची वाट पाहत असतानाच चोरट्याने तिच्याजवळ येऊन तिच्या बॅगमधून पर्स लांबविली. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. काही वेळानंतर या महिलेला आपली बॅग उघडी असल्याचे दिसून आले. त्यात शोध घेतला असता त्याच्यात ठेवलेली पर्स तिला आढळून आली नाही. त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९४ हजाराचा ऐवज ठेवलेला हाेता. घाबरलेल्या या महिलेने बसस्थानकात शोध घेतला; पण चोरटा काही सापडला नाही. यानंतर त्या महिलेने शहर पोलिस ठाणे गाठत बुधवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही.एम. शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.