शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ‘आरटीई’साठी ९५९ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:22 IST

९३ शाळांमध्ये ११८३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे उद्दिष्ट, प्रवेशासाठी नऊ फेºया झाल्या

ठळक मुद्देजिल्ह्यात ९३ शाळांमध्ये देणार होते प्रवेशप्रवेशासाठी नऊ फेºया झाल्याआठ महिन्यात प्रवेश पूर्ण नाही

आॅनलाइन लोकमतधुळे :आर्थिकदृट्या दुर्बल तसेच वंचीत घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आरटीई अंतर्गत  बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के    प्रवेश देण्याची तरतूद  केली आली. २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाचे उद्दिष्ट होते. मात्र पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू होण्याची वेळ आली तरी अद्याप  प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत ९५९ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक श्क्षिण विभागातर्फे सांगण्यात आले.  आर्थिकदृट्या दुर्बल तसेच समाजातील वंचीत घटकातील बालकांना प्रवेश नाकारून विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारून चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. शाळांच्या या मनमानी कारभाराला शिक्षण हक्क कायद्यामुळे लगाम  लागलेला आहे. याच कायद्यानुसार खाजगी शाळांना आता आर्थिक दुर्बल आणि वंचीत घटकांसाठी २५ टक्के प्रवेश राखून ठेवावे लागत आहेत. धुळे जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाची सुरवात २०१३ पासून झाली. २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता १० फेब्रुवारी २०१८पासून आॅनलाईन नोंदणी  सुरू  झाली होती.  ७ मार्च अखेरपर्यंत ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिली आॅनलाईन सोडत १२ मार्च रोजी  सोडत  काढण्यात आली. त्यात ५६८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली होती. मात्र निर्धारित वेळेत पहिल्या प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. दुसºया फेरीच्यावेळीही अशीच मुदतवाढ दिली होती. तिसºया फेरीच्या सोडतीला काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ लागला होता. त्यातनंतर नियमांमध्ये थोडा बदल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. आतापर्यंत नऊ फेºया झालेल्या आहेत. नऊ फेºयांअखेर जिल्ह्यातील ९५९ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. पुढील प्रवेशाबाबत अनिश्चिततादरम्यान आता अनेक शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आता विद्यार्थी प्रवेश केव्हा घेणार? अभ्यास केव्हा करणार? व परीक्षा कधी देणार? असा प्रश्न निर्माण झालो आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत अनिश्चितताच असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे