शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

प्रकाशा येथील पेट्रोल पंपावरून ८० हजारांच्या रोकडची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:54 IST

प्रकाशा-तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा-तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.पोलीस सूत्रानुसार, प्रकाशा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास तेथील कर्मचारी आनंद गावीत, सुनील वसावे व सूरज ठाकरे हे झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी केबिनमध्ये घुसून ८० हजार रुपयांची रोकड लांबवून पळ काढला. त्या वेळी तेथील कर्मचाºयांना जाग आल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी गौतम बोराळे, वंतू गावीत, नीलेश सांगळे, पांडुरंग गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या तपासासाठी श्वानपथक मागविण्यात आले. श्वानपथकाने झाडीपर्यंत माग दाखवला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी भेट दिली. तपास गौतम बोराळे करीत आहेत.दरम्यान, या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. याआधीही पेट्रोल पंप मालकाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.याबाबत आनंद कुवरजी गावीत यांनी याबाबत शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.