शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातून 66 हजार टन ऊस गाळप

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

पिंपळनेर : साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. वास्तविक, तालुक्यात उत्पादित होणारा ऊस हा शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात पाठविला जातो. मात्र, उत्पादन घटल्यामुळे यावर्षी फक्त 66 हजार टन उसाचेच गाळप झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी पांझरा कान साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यातील मोठय़ा प्रमाणातील ऊस हा शेजारील नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याला पाठविण्यात येत असतो. त्या उद्देशाने एका एकरात 80 टन उसाचे उत्पादन घेणा:या शेतक:याला यावर्षी केवळ 40 टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे  50 टक्के उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतक:यांचे उत्पन्न घटले  पिंपळनेर, दहिवेल, कासारे, साक्री या ऊस उत्पादक मंडळामध्ये यंदा वर्षी मोठय़ा प्रमाणात दुष्काळ असल्याने त्याचा शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. पाणी टंचाईमुळे अपेक्षित असलेले उत्पादन  न मिळाल्याने शेतक:यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 25 टक्के उसाचा पुरवठासाक्री तालुक्यात उत्पादित होणारा 25 टक्के ऊस दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना पाठविला जातो. गेल्यावर्षी द्वारकाधीश साखर कारखान्याचे 4 लाख 86 हजार टन ऐवढा ऊस गाळप करण्यात आला होता. पण यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे या कारखान्याचे ऊस गाळप 2 लाख 58 हजार टन एवढेच झाले आहे. रब्बी हंगामात शेतक:यांचा ऊस लागवडीवर भर गेल्या 3 वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतक:यांच्या हाताशी आलेले पीक वाया जात आहे. मात्र, यंदाच्या हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पिंपळनेरसह परिसरातील धरणांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व धरणातील पाणी  पाटचा:यातून सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांनी पुन्हा ऊस लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे.  गेल्या तीन वर्षापासून सतत दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. हे सावरण्यासाठी यंदा उस लागवड केली आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात ऊस असल्याने तो नाशिक जिल्ह्यात निर्यात होतो. तालुक्यातील पांझरा कान साखर कारखाना सुरू व्हावा, ही शेतक:यांची ब:याच वर्षापासूनची मागणी आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे.     - भूषण बोरसे, शेतकरी, देशशिरवाडे