शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:18 IST

 जिल्ह्यात फक्त २९हजार १३० विद्यार्थ्यांनीच  बॅँकेत खाते उघडले

ठळक मुद्देजिल्ह्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८८ हजार ५१६१९ सप्टेंबरपर्यंत २९ हजार १३० विद्यार्थ्यांनीच बँकेत खाते उघडलेगणवेशासाठी ३ कोटी ५४ लाखांचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा

ेधुळे : अर्धे सत्र संपत आले तरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप बॅँक खाती उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार ३८६ विद्यार्थी अद्यापही मोफत गणवेशापासून वंचीत आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत  गणवेश देण्यात येतो. यासाठी विद्यार्थ्याचे आई अथवा वडीलांसोबत राष्टÑीयकृत बॅँकेत संयुक्त खाते उघडणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्सने बॅँकेत खाते उघडावेत असे रिझर्व्ह बॅँकेचे सर्वच राष्टÑीयकृत बॅँकाना  निर्देश आहेत.  मात्र अनेक ठिकाणी राष्टÑीयकृत बॅँका विद्यार्थ्यांचे  झिरो बॅलन्सवर खाते उघण्यास टाळाटाळ करीत आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याचे खाते उघडले जात नाही, तोपर्यंत त्याच्या नावावर गणवेशाची रक्कम जमा होवू शकत नाही. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळावा म्हणून शासनातर्फे दोन टप्यात ३ कोटी ५४ लाख ६०४ रूपये मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र बँकाचीच नकार घंटा असल्याने, अनेक विद्यार्थी प्रथम सत्रात गणवेशापासून वंचीत असल्याचे चित्र आहे.सर्व शिक्षा अभियान विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मोफत गणवेश लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८८ हजार ५१६ इतकी आहे.  त्यात १९ सप्टेंबर अखेरपर्यंत २९ हजार १३० विद्यार्थ्याचे  बॅँक खाती उघडण्यात आलेली आहेत. उर्वरित ५७ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी अद्यापही बॅँकेत खाती उघडलेली नाही. दरम्यान  विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे गणवेश पावत्या सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी पावत्या सादर केल्या, त्यांच्याच खात्यावर ४०० रूपये वर्ग करण्यात येत आहे. मात्र पावत्या सादर करणाºया विद्यार्थ्यांची संख्याही खूपच कमी आहेत. त्यामुळेही अनेकजण गणवेशाच्या लाभापासून वंचीत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी गणवेश घेतला की नाही याची खात्री देणे शिक्षण विभागातील अधिकाºयांनाही शक्य नाही.नाही.