शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५६ ‘शस्त्र’ अन् १२३ ‘आरोपी’ जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:24 IST

धुळे जिल्हा पोलीस : शस्त्र शोध मोहिमेसह वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात आली कारवाई

देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि शस्त्र बाळगणाºयांच्या प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता शस्त्र शोध मोहीम राबवून पोलिसांनी गुंडगिरीच्या मुसक्या आवळल्या़ गेल्या पाच वर्षात पोलिसांनी जिल्ह्याभरातून ५६ शस्त्र हस्तगत केली असून १२३ आरोपींना जेरबंद केले आहे़ शस्त्रधारकांविरुध्द कारवाईनाशिक परिक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात अवैध शस्त्र धारकांविरुध्द कारवाई करण्यात आली़ ३ मे २०१८ पासून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत गावठी कट्टे, पिस्तूलसह जिवंत काडतूस, तलवारी असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्या होत्या़मोहिमेची पार्श्वभूमीनाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहरात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी विनापरवाना अवैध शस्त्राचा वापर करुन युवकांच्या हत्या केल्याच्या २ घटना घडलेल्या होत्या़ शस्त्रांचा वापर करुन सलग घडलेल्या दोन हत्येच्या घटनांची विनयकुमार चौबे यांनी गंभीरतेने दखल घेतली होती़ या परिक्षेत्रात अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विनापरवाना व बेकायदा पिस्तूल, गावठी कट्टे, घातक शस्त्रे, बाळगणाºया गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना सुचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार ३ ते २२ मे २०१८ पावेतो शस्त्र शोधण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली़ अधिकाºयांचा समावेशया मोहिमेत जिल्ह्यांमधील अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली़ त्यांच्याद्वारे अवैध शस्त्रांविरुध्दच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती़ कोम्बिंग आॅपरेशनचा फायदायानंतर जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळ्या टप्प्यात कोम्बिंग आॅपरेशन राबविले़ त्यातून शस्त्र हस्तगत करण्यात आली़ संशयितांना जेरबंदही केले़ अचानक राबविलेली ही मोहीम कौतुकास पात्र आहे़ पण, आमदार अनिल गोटे यांनी जुगार अड्यावर धाड टाकल्यामुळे पोलीस प्रशासन टिकेचे धनी ठरले होते़ त्यात पुन्हा विनयकुमार चौबे यांनी शोध मोहीम राबवून शस्त्र हस्तगत करण्याच्या सूचना पारीत केल्या़ या दोनही बाबी एकास वेळेस आल्याने धुळे पोलीस तसे ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले होते़ एका पाठोपाठ गावठी कट्टा, रिव्हॉलव्हर, हस्तगत करण्यात आले़ बिनधास्तपणे धारदार शस्त्र यांच्याकडे येतातच कुठून? आले तर ते जातात कुठे? याचा व्यवहार होतो कसा? याचा सर्वंकष शोध घेण्याची आवश्यकता आहे़ या कारवाईमुळे गुंडांचे चांगलेच धाबे दणाणले होते़गुन्ह्यांचे स्वरुप        २०१५    २०१६    २०१७    २०१८    २०१९एकूण शस्त्र जप्त        ०६    ०९    १७    २४    ०२एकूण अटक आरोपी        ०७    २७    ३९    ४७    ०३दाखल गुन्ह्यांची संख्या    ०५    ०७    १०    २६    ०२

टॅग्स :Dhuleधुळे