शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत ५४.४० टक्के जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:09 IST

बारापैकी तीन प्रकल्प ‘फुल्ल’ : चार प्रकल्प मात्र अद्याप कोरडे 

ठळक मुद्देगेल्या महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा साक्री तालुक्यातील तीन प्रकल्प ‘‘फुल्ल’चार प्रकल्पांत मात्र अद्याप पाण्याचा ठणठणाट

लोकमत आॅनलाईनधुळे : जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये आॅगस्ट महिन्याअखेर ५४.४० टक्के जलसाठा झाला आहे. शनिवारी जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्पांत मिळून २०३.१३ दलघमी एवढा साठा झाला असून त्याची टक्केवारी ५४.४० एवढी आहे. उपयुक्त साठा १३१.५० दलघमीवर पोहचला आहे.  जोरदार पावसाअभावी जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्पांत मिळून अवघा १८-२० टक्के साठा झाला होता. मात्र मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये आॅगस्ट महिन्यात साठा वाढत गेला. पावसाचे पुनरागमन झाले त्या वेळी १९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे नद्या-नाल्यांनाही यंदा पहिल्यांदा पूर आला. त्यामुळे सर्वप्रथम ााक्री तालुक्यात पांझरा नदीवर असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर जामखेडी व मालनगाव हे याच तालुक्यातील मध्यम प्रकल्पही ‘ओव्हरफ्लो’ झाले. या प्रकल्पांमधून ओसंडणारे पाणी खालील बाजूस असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पात आले. त्यामुळे हा प्रकल्पही ५५ ते ६० टक्के भरला. मात्र त्यातील बॅकवॉटर शेतांमध्ये शिरत असल्याने या प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यांमध्ये विसर्ग अनुक्रमे ७० व १२० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला. तो अद्याप सुरू आहे. या प्रकल्पातून धुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावातही पाणी सोडण्यात येत आहे. पांझरा नदीपात्रात सोडलेले पाणी पाटचारीद्वारे नेऊन सोनवद धरणही भरण्यास सुरूवात झाली आहे.जिल्ह्यात आजमितीस पांझरा (लाटीपाडा), जामखेडी, मालनगाव हे तीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पांझरा धरणातून उजव्या कालव्यात ९० तर जामखेडी धरणातून डाव्या कालव्यात ३० क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे. या तिन्ही धरणांच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. अक्कलपाडा धरणाच्या सांडव्यातूनही विसर्ग करण्यात येत आहे. बुराई धरण ७६.०५, करवंद धरण ५६.१९, अनेर धरण ६६.०२ , अक्कलपाडा प्रकल्प ४७.५१ तर सुलवाडे बॅरेजमध्ये ७३.८४ टक्के साठा झाला आहे. जिल्ह्यातील कनोली, सोनवद, वाडीशेवाडी व अमरावती या चार प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही साठा होऊ शकलेला नाही. गतवर्षी साक्री तालुक्यातील तिन्ही प्रकल्पांसह शिरपूर तालुक्यातील करवंद असे चार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा तीनच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री