शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

 धुळे जिल्हयातील  ५३०० विद्यार्थी घेतात अभ्यासिकांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 12:21 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत अभ्यासिकांसाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात १६२ अभ्यासिका सुरूअभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवकांची नियुक्तीविद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेतायेत लाभ

आॅनलाईन लोकमतधुळे : मानव विकास कार्यक्रमांतर्गत   २०१७-१८  या वर्षात जिल्ह्यात १६२ अभ्यासिका सुरू आहेत.  त्याचा  जिल्हयातील ५२९८ विद्यार्थी लाभ घेत आहेत. या अभ्यासिकांसाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयातून मिळाली आहे. मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारित योजना राबविणे या पार्श्वभूमिवर २०११-१२ व २०१२-१३ मध्ये मंजुरी दिलेल्या अभ्यासिकांपैकी ज्या अभ्यासिका २०१७-१८  मध्ये सुरू आहेत, त्या अभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवक तसेच इतर खर्चाच्या आर्थिक तरतुदीसाठीचा संबंधित अधिकाºयांचा अहवाल मिळाला आहे. शहरी भाग वगळून जिल्हयातील  धुळेसह साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील काही प्रमुख  गावांमध्ये या अभ्यासिका सुरू आहेत.  अभ्यासिकेचे कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी   अभ्यासिकेत व्यवस्थापक व सेवक यांची नियुक्ती करण्यात येते. या दोघांनाही ठराविक मानधन देण्यात येत असते.  एका अभ्यासिकेतील व्यवस्थापक व सेवक मिळून ७ हजार व इतर खर्च २ हजार असा एकूण ९ हजार रूपये साधारणत: दरवर्षाला खर्च येत असतो. यासाठी १४ लाख ५८ हजार रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यात ११ लाख ३४ हजार व्यवस्थापक व सेवकांच्या मानधनावर तर ३ लाख २४ हजार रूपये इतर खर्च अपेक्षित आहे.५२९८ विद्यार्थी घेतात लाभया अभ्यासिकांचा  कालावधी जुलै ते मार्च असा ९ महिन्यांचा असतो. या अभ्यासिकांचा लाभ जिल्ह्यातील ५हजार २९८ विद्यार्थी घेत आहेत. यात  धुळे तालुक्यातील १२०६, साक्री तालुक्यातील १८१८, शिंदखेडा तालुक्यातील १६४२  व शिरपूर तालुक्यातील ६३२ विद्यार्थी लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासिकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होत असतो.