शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेसाठी ४६ कोटींचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:05 IST

महापालिका : ‘डीपीआर’ला शासनाची मंजुरी, स्वमालकीच्या जागेवर घर बांधण्यास अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रधानमंत्री आवास योजनेस आवश्यक ती व्यापकता व गती यावी यासाठी शासन मान्यतेने खासगी जमीन मालक व म्हाडा यांच्यातील संयुक्त भागीदारीतून घरकुलांची निर्मिती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे़ त्यानुषंगाने मनपाने दोन ‘डीपीआर’ तयार करून म्हाडाला सादर केले होते, हे दोन्ही ‘डीपीआर’ मंजूर झाले असून ४६ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन घटकांसाठी मनपाने जुलै २०१६ मध्ये अर्ज मागविले होते़ विहीत कालावधीत तब्बल साडेबारा हजार अर्जांची विक्री झाली़ तर साडेसहा हजार अर्ज विहीत मुदतीत दाखल झाले होते़ या योजनेत घटक क्रमांक दोनमध्ये नवीन बांधकाम, गृहखरेदी, सध्या राहत असलेल्या स्वमालकीच्या घराच्या विस्ताराकरिता बँकांमार्फत कर्जपुरवठा व ६ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर द़सा़द़शे ६़५ टक्केप्रमाणे व्याजदरात सवलत़ घटक क्रमांक तीनमध्ये सार्वजनिक बांधकाम व खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्रापर्यंतची सदनिका परवडणाºया दरात उपलब्ध, शासनाचे रक्कम २़५ लाखांपर्यंत अनुदान व चौथ्या घटकात स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यासाठी २़५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान वितरित केले जाणार आहे़दरम्यान, महापालिकेने घटक क्रमांक ४ साठी पहिल्या टप्प्यात दोन डीपीआर तयार केले होते़ त्यात एका डीपीआरमध्ये ५१० व दुसºया डीपीआर मध्ये ३४० लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता़ एकूण ८५० लाभार्थ्यांसाठी शासनाला हे दोन्ही डीपीआर सादर करण्यात आले होते़ शिवाय त्यात दोनवेळा दुरूस्ती देखील करण्यात आली होती़ मात्र त्यानंतर ते प्रलंबित होते़ मनपा निवडणूकीत प्रचार सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळयात आले असता त्यांनी आवास योजनेसाठी मनपाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार मनपा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता़ शासनाने पहिल्या टप्प्यात ८५० लाभार्थ्यांसाठी ४६ कोटी रूपयांचे ‘डीपीआर’ मंजूर केल्याची माहिती आयुक्तांनी दिली़या निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास शासनाकडून अडीच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे़ त्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ३ लाखापर्यंत आहे़संयुक्त भागीदारीतूनही घरकुलेज्यांच्या मालकीची जमीन आहे अशा खासगी व्यक्ती म्हाडा समवेत संयुक्त भागीदार म्हणून शासन मान्यतेने या योजनेत सहभागी होऊ शकतील़ परंतु त्यासाठी शासनाने भागीदारांची निवड करण्याचे मापदंड शासनाने जाहीर केले आहेत़ संयुक्त भागीदारी धोरणांतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी घरकुले बांधण्यात येणार आहेत़ तसेच या प्रकल्पांसाठी उपलब्ध होणाºया जमिनीवर आवश्यक बांधकाम, प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा, प्रकल्प मंजूरीसाठी लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे शुल्क, प्रकल्प व्यवस्थापन खर्च, प्रशासन खर्च तसेच बांधकामाकरिता व विपणनासाठी लागणारे शुल्क इतर बाबींवर खर्च करून म्हाडा गृहप्रकल्प पुर्ण करणार आहे़ संयुक्त भागीदारी धोरणांतर्गत पात्र गृहप्रकल्पांना रहिवाशी क्षेत्रात २़५ चटई क्षेत्रफळ निर्देशांक तर हरीत क्षेत्रात १़० चटई क्षेत्रफळ निर्देशांक अनुज्ञेय असेल़

टॅग्स :Dhuleधुळे