शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील भुयारी गटारींसाठी महापालिकेवर पडणार ४३ कोटींचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 17:18 IST

जीवन प्राधिकरणाकडून १० कोटी अंमलबजावणी शुल्क, मंगळवारी ठराव होणार

ठळक मुद्देभुयारी गटारींसाठी १३१ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूरमहासभेत भुयारी गटार योजना जीवन प्राधिकरणाकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग करण्याचा ठराव केला जाईल मनपा प्रशासनाकडून  नियोजन सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटारींसाठी १३१ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्याचे आदेश शासनाने दिल्यामुळे ३३ कोटी रूपयांच्या स्वहिश्श्यासह १० कोटी रूपयांचे मजीप्रा इटीपी चार्जेस भरावे लागणार आहेत़ एकूण ४३ कोटी रूपयांची तजवीज मनपाला करावी लागणार आहे़केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शहरात मलनिस्सारण अर्थात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १३१ कोटी ५४ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे़ योजना अचानक वर्गभुयारी गटार योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्याने महापालिकेने काढलेली ई-निविदा स्विकारण्याची मुदत २७ नोव्हेंबर होती़ मुदत आठ दिवसांवर आली असतांनाच अचानक राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ही योजना पूर्ण ठेव तत्वावर जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे़ तसे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत़ शासनाचे पत्र आल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ ई-निविदा प्रक्रिया रद्द केली असून योजना मजीप्राकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे़ मंगळवारी होणार ठरावशासनाच्या पत्रात महासभेचा ठराव सादर करण्याचेही आदेश असल्याने मंगळवारी २८ नोव्हेंबरला आयोजित महासभेत भुयारी गटार योजना जीवन प्राधिकरणाकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग करण्याचा ठराव केला जाणार आहे़ सदर योजना मनपातर्फे राबविण्यात आली असती तर तांत्रिक सल्लागार म्हणून प्रकल्प किमतीच्या ३ टक्केप्रमाणे मजीप्राला शुल्क द्यावे लागणार होते़ मात्र, आता योजना मजीप्राकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग होत असल्याने त्यासाठी मजीप्राला इटीपी चार्जेससाठी एकूण प्रकल्प किमतीच्या ७़५ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे़ ही रक्कम ९ कोटी ८६ लाख रुपयांपर्यंत जाते़ मनपा हिस्सा व इतर अनुषंगिक शुल्काची आकारणी झाल्यास योजनेपोटी मनपाला सुमारे ४३ कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा भार उचलावा लागणार आहे़ मनपा प्रशासनाकडून त्याबाबतचे नियोजन सुरू असले तरी सलग दुसरी योजना मजीप्राकडे वर्ग होत असल्याने महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़निधीचे विभाजन असेभुयारी गटार योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ५० टक्के म्हणजे ६५ कोटी ७७ लाख रूपये व राज्य शासनाकडून २५ टक्के अर्थात ३२ कोटी ८८ लाख ५० हजार रूपयांचा निधी मिळणार आहे़ तर प्रकल्प किमतीच्या २५ टक्के सहभाग महापालिकेचा असणार असून ती रक्कम ३२ कोटी ८८ लाख ५० हजार इतकी आहे़ तर मजीप्राला द्यावे लागणारे शुल्क ९ कोटी ८६ लाख इतके  आहे़