शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बिजासन घाटातील अपघातात एकाच कुटूंबातील चौघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:27 IST

३ गंभीर जखमीत २ वर्षाचा एक चिमुकला

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात सेंधव्याकडून येणारा तेलाचा टँकरचा बे्रक नादुरूस्त झाल्यामुळे तो दुभाजक तोडून विरूध्द दिशेला घसरून पडला़ त्याचवेळी शिरपूरकडून सेंधव्याला दुचाकी गाडीने जाणाऱ्या एकाच कुटुंबातील पती-पत्नींसह चिमुकले मुले दबल्याने ४ जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली़ तसेच ३ गंभीर जखमीत २ वर्षाचा एक चिमुकला आहे़१७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महामार्गावरील बिजासन घाटाच्यावर ही दुर्दैवी घटना घडली़ सेंधवाकडून तेल भरून येणारा टँकटरचे अचानक ब्रेक नादुरूस्त झाल्यामुळे तशातच उतरती असल्यामुळे टँकर जोराने आल्याने चालक सरळ दुभाजकाला जावून आदळला़ टँकर एवढा जोरात होता की दुभाजक तोडून विरूध्द दिशेला जावून आदळला़ त्याचवेळी दोंदवाडीपाडा-पनाखेड ता़शिरपूर येथील सासरी आलेला कमल भिमसिंग पटेल (३८) राहणार साकड (सेंधवा) हा पत्नीसह ४ मुलांना घेवून दुचाकी गाडीने निघाला होता़ मार्गस्थ होत असतांनाच त्याच्या अंगावर काही न कळण्यापूर्वीच टँकर अंगावर आल्याने त्यात त्याच्यासह पत्नी नुरमाबाई (३५), मुलगी गौरी (२) गुडीया (१) असे चौघे जण दाबले गेल्याने जागीच मृत्यु झाला़ या दुर्दैवी घटनेत कमलची २ वर्षाची चिमुकली गुंजा (४) व ३ महिन्याची चिमुकली मुलगी रस्त्याच्या बाजूला फेकल्यामुळे ते दोघे बचावलेत़ त्यांना तातडीने सेंधवा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ मयत पावरा कुटुंब हे साकड-सेंधवा गावी जाण्यासाठी निघाले होते़ या घटनेत टँकर चालक व सहचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत़ टँकर दुभाजकाला आदळल्यामुळे तो फुटल्यामुळे रस्त्यावर पूर्णत: तेल पडले होते़ रस्त्याचे दोन्ही बाजू पूर्णत: तेलाचे झाले होते़ घटनेची माहिती सेंधवा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने सेंधवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले़ टँकर रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे एका बाजूची रहदारी ठप्प झाली होती़ तशातच रस्त्यावर पूर्णत: तेल असल्यामुळे एका बाजूने हळूवारपणे रहदारी करण्यात आली़ काहीवेळानंतर टँकर बाजूला करून रहदारी पूर्ववत करण्यात आली़ मयतांचे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रांताधिकारी घनश्याम धनगर यांनी शव मयतांच्या गावी घेवून जाण्यासाठी व्यवस्था केली़ मयत कमल भिमसिंग पावरा याच्या वडिलांना साकड गावाचे सरपंच रविदास सोलंकी यांनी तातडीची मदत म्हणून ५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली़

टॅग्स :Dhuleधुळे