शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरातच 34 गावांना ‘टंचाई’!

By admin | Updated: January 8, 2017 00:32 IST

धुळे : जिल्ह्यातील 34 गावांना येत्या महिन्याभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आह़े

धुळे : जिल्ह्यातील 34 गावांना येत्या महिन्याभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आह़े त्यानुसार आतापासूनच नियोजन करण्यास विभागाने सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितल़े गुरूवारी या संदर्भात विभागामार्फत आढावा घेण्यात येऊन टंचाई भासणा:या गावांची ओळख पटविल्याची माहिती या विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. पढय़ार यांनी दिली.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झालेली आह़े ती निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने लक्ष केंद्रित करण्यात आले आह़े टंचाई निवारण्याकामी जिल्हा प्रशासनाचीदेखील मदत घेतली जात असून आवश्यक त्या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावादेखील करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आह़े गावांच्या मागणीला सध्या प्राधान्यक्रम देण्यात आला आह़े टँकरने पाणीपुरवठाआवश्यक त्या पाणीपुरवठय़ाच्या योजना कुचकामी ठरल्यानंतर तातडीची योजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेण्यात येतो़ ही बाब सर्वाधिक खर्चिक असली तरी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणे महत्त्वाचे आह़े डिसेंबर महिन्यात जेमतेम पाणी मिळत होते. परंतु आता टॅँकर सुरू करणे गरजेचे ठरले आहे. सुरुवातीला धुळे तालुक्यातील कुंडाणे (वेल्हाणे), अजंग आणि साक्री तालुक्यातील बेहेड या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत होता़ त्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील पथारे या गावांना टँकर सुरू करण्यात आला़ तर वारुड येथे गेल्या वर्षभरापासूनच टॅँकर सुरू आहे. धुळे तालुक्यात धामणगाव, जुन्नर, मोरदड, तांडा कुंडाणे, साक्री तालुक्यात पारगाव, सालटेक आणि शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावांना टँकर सुरू झाले आहेत.   नव्या वर्षाला सुरूवात होताच विहिरींचे टप्प्याटप्प्याने अधिग्रहण करण्यास पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात झाली आहे.  आरंभी 45 विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. पण, टंचाईची दाहकता वाढल्याने अधिग्रहीत विहिरींची संख्या वाढत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावक:यांची तहान भागविली जात आह़े जिल्ह्यात तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आह़े जिल्ह्यात 18 ठिकाणी ही योजना मंजूर करण्यात आली आह़े धुळे तालुक्यात 11, साक्री तालुक्यात 5, शिंदखेडा तालुक्यात 2 याप्रमाणे 18 ठिकाणी तात्पुरत्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या़