शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरच्या दंगलप्रकरणी ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 13:28 IST

७ जणांना अटक : पहाटेची कारवाई, इतरांची धरपकड सुरु

ठळक मुद्देसोनगीर गावात दोन गटात उसळली दंगलरविवारी पहाटे ३२ जणांविरुध्द गुन्हा, ७ अटकेतपोलिसांचा बंदोबस्त, तणावपुर्ण शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील सोनगीर गावात भाजी विक्रेत्यांमध्ये गाडी लावण्याच्या वादातून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर आले़ किरकोळ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ याप्रकरणी रविवारी पहाटे पावणे चार वाजता ३२ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ पहाटेचा धरपकड करत ७ जणांना अटक करण्यात आली आहे़ घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस दाखल झाले होते़ धुळ्यातूनही पोलीस अधिकारी, कर्मचारी सोनगीरला रवाना झाले होते़ दोन जणांमधील वाद विकोपाला गेल्याने भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ दोन गट समोरा-समोर भिडल्याने आणि दगडफेकीमुळे सोनगीर गावात तणाव निर्माण झाला होता़ परिणामी भितीचे वातावरण तयार झाल्याने उलट-सुलट अफवा पसरल्या़ घटनेचे गांभिर्य पहाता धुळ्यातूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा सोनगीरला रवाना झाला होता़ सोनगिरात तणावपुर्ण शांतता आहे़ रविवारी पहाटे पावणे चार वाजता संशयित ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ पैकी ७ जणांना अटक करण्यात आली़ त्यात दीपक अशोक माळी (२४), संतोष भगवान अहिरे (२८), बुधा भगवान माळी (३४), प्रशांत प्रभाकर चव्हाण (३१), हर्षदखान फरीदखान कुरेशी (२७), वसीम खान मोसीन खान (२२), शेरु खान अब्बास खान (४६) या संशयितांना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत़