शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

८ पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पंजाब राज्यातील ३ संशयितांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:16 IST

महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेभागात भल्या पहाटे कारवाई

शिरपूर - पंजाब येथील ३ संशयितांना मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेभागालगत ८ पिस्तूल, ६ जिवंत काडतूसे, १५ हजार रोख रक्कमसह ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या तिनही संशयितांना अटक करण्यात आली़ ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास केली़पंजाब राज्यातून काही संशयित हे अग्नीशस्त्र खरेदी करण्याच्या इराद्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या भागात आल्याची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. लागलीच पथकातील नरेंद्र खैरनार, राजू सोनवणे, चत्तरसिंग खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी, संभाजी वळवी यांच्या पथकाने पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास शोध घेण्यास सुरवात केली.पोलीस पथकाने महाराष्ट्र मधप्रदेश सिमाभागातील वरला खंबाळे रोडवर गस्त व तपासणी करीत असतांना साडेतीन वाजेच्या सुमारास जोयदा गावापासून वरला बाजुकडे काही अंतरावर एक पंजाब पासिंगची एक कार येतांना दिसली. सदर कारचा संशय आल्याने कार थांबविण्यात आली़ या कारमध्ये बसलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील काळ्या रंगाच्या बॅग मध्ये ८ देशी पिस्तूल व जिवंत काडतूसे मिळून आले. पकडलेल्या संशयितांमध्ये सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शिख (२१ रा. बुलेरीयन ता. मलोट जि. मुखसर, पंजाब) लवदीपसिंह दलजितसिंह जाट (२३ रा़ कोटईशिका ता. धरमकोट जि. मोघा, पंजाब), दरजनसिंह बलविंदसिंह जाट (३०, रा. गुरुतेग बहादर नगर, ता. फरिदकोट, पंजाब) या तिघांचा समावेश आहे़ त्यांच्या चौकशीतून ८ पिस्तूल, ६ जिवंत काडतूसे, ३ मोबाईल व १५ हजार रोख व कार असा एकुण ५ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़जप्त केलेले पिस्तूल हे वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश येथून राजु नामक व्यक्तीकडुन खरेदी केले असून हे पिस्तुल पंजाब येथे स्वत: करीता तसेच मित्रांच्या स्वरक्षणार्थकरीता बाळगण्यासाठी नेणार असल्याचे संशयितांकडून सांगतात आले आहे.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे