शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भीतीने ३८० कोंबड्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:30 IST

मध्यरात्रीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ : चिकसे येथील गांगेश्वर शिवारातील घटना 

पिंपळनेर : संध्याकाळी पोल्ट्री फॉर्मवर येऊन धुमाकूळ घालणाºया बिबट्याच्या भीतीने तेथील ३८० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून हजारोंचे नुकसान झाले आहे. साक्री तालुक्यातील चिकसे येथे रविवारी ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. चिकसे येथील गांगेश्वर शिवारात अविनाश अंबादास पाटील यांचे मातोश्री पोल्ट्री फॉर्म असून तेथे सुमारे ४ हजारापेक्षा जास्त कोंबड्या आहेत. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक फॉर्मवर येऊन जाळीवर धडका देत डरकाळी फोडल्याने भीतीनेच फॉर्ममधील सुमारे ३८० कोंबड्यांनी जीव सोडला. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली असून मध्यरात्री एक वाजेपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे कळताच त्याला पळविण्यासाठी फटाके फोडण्यात आले. तसेच मिरचीचा धुराळा केला व लाकडे पेटवून मोठी शेकोटीही करण्यात आली. त्यानंतर बिबट्याने काढता पाय घेतला. ३८० कोंबड्या मृत सकाळी पोल्ट्री फॉर्मवर जाऊन पाहणी केली असता सुमारे ३८० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची सूचना वनविभागाच्या येथील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला. बिबट्याचा उच्छाद सुरूचवनविभाग मात्र सुस्त  शेतकरी पाटील यांनी सांगितले की, गांगेश्वर शिवारात बिबट्याचा उच्छाद कायम आहे. कारण यापूर्वीही २० ते २५ गायी, शेळ्या व म्हशी या बिबट्याने फस्त केल्या आहेत. मात्र वनविभागाकडून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व संतापही व्यक्त होत आहे. गुरांवरच नव्हे तर बिबट्याने ग्रामस्थांवरही हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. बिबट्याच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यासाठी वनविभागाकडे पैसे नाहीत. पिंजराही लावला जात नसल्याने बिबट्या मोकाट असून पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांना भयभीत करत आहे. शेतकºयांना तर जास्त हाल सहन करावे लागत आहेत. वनविभाग एखाद्या शेतकºयाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा प्रश्न शेतकरी पाटील यांनी उपस्थित केला. वनविभागाने त्वरित पिंजरा बसवून संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा शोध घ्यावा. त्यास पिंजºयात कैद केल्याशिवाय स्वस्थ बसू नये. अन्यथा चिकसे, गांगेश्वर-सामोडे परिसरातील सर्व शेतकरी वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा वनविभागाला देण्यात आला आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे