शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 11:30 IST

१८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे विद्यार्थ्यांची कलचाचणी

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात ४५६ शाळा३४ हजार ८१२ पैकी २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी दिली चाचणी५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

आॅनलाइन लोकमतधुळे : दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक आवड आहे,  याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोबाईलद्वारे कल चाचणी घेण्यात येत आहे.  आतापर्यंत धुळे जिल्ह्यात ४५६ शाळांमधील ३४ हजार ८१२ पैकी २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिल्याची माहिती कल चाचणीच्या जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे. भविष्यातील करिअरच्या वाटा निवडतांना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी  महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाऊंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे,  याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.  या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होणार आहे.चाचणी घेण्यास मुदतवाढजिल्ह्यात १८ डिसेंबरपासून कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी पहिल्यांदाच मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. ही चाचणी २० जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश होते. मात्र आता कलचाचणी घेण्यास मुदतवाढ मिळालेली असून, ५ फेब्रुवारीपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३४ हजार ८१२ एवढी आहे. २२ जानेवारी अखेरपर्यंत २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे. जिल्ह्यात कल चाचणीचे प्रमाण ८० टक्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.   यात धुळे ग्रामीणमध्ये ६ हजार ९९, साक्री तालुक्यातील ६ हजार १९, शिंदखेडा तालुक्यातील ४ हजार ५७३, शिरपूर तालुक्यातील ४ हजार ९८२ व धुळे शहरातील ६ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल चाचणी दिलेली आहे.  यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, तसेच कलचाचणीच्या जिल्हा समन्वयक तथा डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.  

टॅग्स :Dhuleधुळे