शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जैताणे ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांअभावी ताटकळले 200 रूग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:25 IST

नेमणूकच नसल्याचा डॉक्टरचा खुलासा

ठळक मुद्दे ग्रामीण रूग्णालय कर्मचा:यांशी हमरीतुमरी नित्याचाच प्रकार असल्याने वैद्यकीय कर्मचा:यांवर रोष

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 19 - जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने शेकडो रूग्ण ताटकळले होत़े अखेर परिसरातील युवकांचा संताप अनावर झाल्याने त्यांची ग्रामीण रूग्णालय कर्मचा:यांशी हमरीतुमरी झाल्याची घटना घडली़ जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराचा भोंगळपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला. सोमवार हा जैताणेच्या आठवडे बाजाराचा दिवस आहे. यानिमित्ताने जैताणे निजामपूरसह माळमाथ्यावरील रूग्ण येथील सरकारी आरोग्य केंद्रात येत असतात़ सोमवारी सकाळी 8 वाजेपासून 200 ते 250 महिला ज्येष्ठ नागरिक रुग्णालयातील कर्मचा:यांच्या प्रतीक्षेत बसून होत़े 11़30 वाजूनही ग्रामीण रूग्णालयातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता़ आजारपणाच्या व्यथा घेऊन आलेल्या नागरिकांचा यामुळे संताप होत असतानाच परिसरातील काही तरूण याठिकाणी आले. त्यांनी पाहिलेला प्रकार नित्याचाच असल्याने त्यांचाही रोष वैद्यकीय कर्मचा:यांवर होता. त्यापैकी काहींनी या कर्मचा:यांकडे वरिष्ठांच्या संपर्क क्रमांकाची मागणी केली़ कर्मचा:यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या तरूणांनी लेटलतिफ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिका:यांना गेटवरच अडवत जाब विचारला त्यावेळी आरोग्य अधिका:याने आपली नेमणूक जैताणे येथे नाहीच, आठवड्यातून एक दिवस रोटेशन वर त्याना तिथे पाठवण्यात आले असून दुपारून पुन्हा साक्री ग्रामीण रूग्णालयात हजेरी लावायची असल्याने ते भोंगळ कारभराला जबाबदार नाहीत असे त्यांनी सांगितल़े