शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मोराणे येथील दूध संकलन केंद्रातून २ लाख ८१ हजाराची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:18 IST

अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

ठळक मुद्दे चोरट्यांनी या दूध संकलन कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ८१ हजार ९८० रूपये लंपास केले.साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, यांनी भेट देवून पहाणी केली.

आॅनलाइन लोकमतधुळे : मोराणे (प्र.ल.)शिवारात असलेल्या एका दूध संकलन केंद्रातून अज्ञात चोरट्याने कपाटातून २ लाख ८१ हजार रूपये लंपास केले. ही घटना ८ एप्रिल रोजीच्या रात्री ८.३० ते ९ एप्रिलच्या सकाळी ७.३० वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुळे- साक्री रोडवरील मोराणे (प्र.ल) शिवारात सत्यप्रकाश मनोज शुक्ल (वय २१, रा. स्वामी नगर, देवपूर धुळे) यांचे शुक्ला दूध संकलन केंद्र आहे. ८ रोजी हे दूध संकलन केंद्र रात्री बंद करण्यात आले.अज्ञात चोरट्यांनी या दूध संकलन कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ८१ हजार ९८० रूपये लंपास केले.घटनास्थळी साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, यांनी भेट देवून पहाणी केली.या चोरीमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी सत्यप्रकाश शुक्ला यानी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवि ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोटे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे