शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते चौथीच्या विध्यार्थ्यांना मिळणार वर्गोन्नती; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नाहीत, पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात सुरुवातीला महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक ...

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात सुरुवातीला महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक व त्यानंतर शेवटच्या टप्प्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा सुरू झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही बाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच कोरोनाची दुसरी लाट अतिशय तीव्र झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले तसेच त्यांच्या परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर वर्गोन्नती असा उल्लेख येणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी असे पत्रात म्हटले आहे. मात्र, तसा उल्लेख प्रगती पुस्तकावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून विद्यार्थीही कंटाळले आहेत. घरकामात तसेच शेतीच्या कामात विद्यार्थी मदत करत आहेत. कोरोनाचा संसर्ग लवकर संपून शाळा सुरू होण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रगती पुस्तकच बदलणार-

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या तसेच यंदा परीक्षाच झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे अशा आशयाचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. दरवर्षी प्रगती पुस्तकावर येणारी श्रेणी यावेळी येणार नाही. त्यामुळे प्रगती पुस्तकच बदलणार आहे. प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत उल्लेख करण्याबाबत सूचना नसल्याची माहिती मिळाली.

मुले घरात कंटाळली-

शाळा बंद असल्याने नुकसान होत आहे; पण काेरोना वाढल्याने शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सद्या घरीच अभ्यास करतो. कोरोना संपून शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत.

- पूजा कोळी, वाडी

इयत्ता चौथी

यंदा परीक्षा झाल्या नाहीत; पण पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. काेरोना संपून शाळा लवकर सुरू व्हायला पाहिजे.

-

वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून कंटाळा आला आहे. ऑनलाईन अभ्यासासोबतच घरी व शेतात मदत करत आहे.

- आरुषी धनगर, वाडी

इयत्ता तिसरी

शिक्षण अधिकारी :

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. मात्र, प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्याबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्याबाबतच्या सूचना मिळाल्यानंतर शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल.

मनीष पवार, शिक्षण अधिकारी