शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातून १९ उपकरणांची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:54 IST

धुळे येथे सुरू होते तीन दिवस, विज्ञान प्रदर्शन, विजेत्यांचा केला सत्कार

ठळक मुद्देविभागीय प्रदर्शनात १८६ उपकरणे मांडलेशिवाजी हायस्कूलमध्ये सुरू होते विज्ञान प्रदर्शनधुळ्यातून ९, जळगावातून ६ तर नंदुरबारचे ४ उपकरणे निवडले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इन्स्पायर अवॉर्ड विभागीय विज्ञान प्रदर्शनातून १९ उपकरणांची निवड राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आलेली आहे. यात धुळ्याचे ९, जळगावचे ६ व नंदुरबार जिल्ह्यातील ४ उपकरणांचा समावेश आहे.या विज्ञान प्रदर्शनात १८६ उपकरणे मांडण्यात आली होती. त्यात धुळ्याचे ८६, जळगावचे ६० व नंदुरबार जिल्ह्यातील ४० उपकरणांचा समावेश होता.विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर व शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचा शुक्रवारी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले होते. व्यासपीठावर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डी.बी.पाटील, महेंद्र सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे आदी होते.या वेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तक व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विभागीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातून राज्यस्तरावर निवड झालेले विद्यार्थी, कंसात गाव व उपकरणाचे नाव असे-धुळे जिल्हा-रूपेश प्रदीप शिंदे ( मोहाडी धुळे-कचरा निर्मूलनाची आधुनिक पद्धत), दिग्विजय जयवंत भामरे (देवपूर, धुळे- सौर सायकल), सुभाष दिनेश पाटील (धुळे- आधुनिक विकसनशील शेती), अवैस साजीत शेख (साक्री- आधुनिक पार्किंग), संध्या किरण नंदन (साक्री- रस्त्यावरील कचरा सुव्यवस्थापन), पल्लवी विजय नेरकर (साक्री- कचरा व्यवस्थापन व जलाशय संरक्षण), देवेश संजय सोनवणे (भालणे, ता.साक्री- इलेक्ट्रिसिटी जनरेशन), रितीक सुनील जैन (शिंदखेडा- वेस्ट मॅनेजमेंट इन रेल्वे), साक्षी शशिकांत पवार (शिंदखेडा- आॅटो सेल्फ क्लिनिंग टॉयलेट).जळगाव जिल्हा- अमृता सुधाकर पाटील (वरणगाव- आधुनिक स्प्रे पंप), शुभम नावरे (उंबरखेड), मेघना दिलीप कुळकर्णी (मेहुणबारे, नदीची स्वच्छता), सोहम सुनील राठी (एरंडोल- सिंचनाची आधुनिक पद्धत), वेदांत नितीन महाजन (रावेर), आदित्य सुनील देशमुख (यावल, सौर रेल्वे).नंदुरबार जिल्हा- आर्या दिनेश पाटील (नंदुरबार- हायटेक फॅन), कशहिती श्यामसिंग वळवी (नंदुबार), गणेशराज निंबा पाटील (विखरण), क्रितिका संदीप वसावे.