शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात डेंग्यूचे 180 संशयित रूग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 12:31 IST

शहरात 142 रूग्ण : मलेरियाचेही 53 रूग्ण आढळले, आरोग्य विभागाकडून उपाययोजनांना वेग

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 14 -  शहरासह जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूची साथ सुरू आह़े जिल्हाभरात आतार्पयत डेंग्यूचे तब्बल 180 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 142 रूग्ण धुळे शहरातील आह़े तर एकूण 23 रूग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली़धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यू, मलेरियाच्या रूग्णांची संख्या कमी असली तरी या आजारांच्या रूग्णसंख्येत वाढ होत आह़े खासगी दवाखान्यांमधील प्राथमिक चाचण्या केल्यानंतर डेंग्यू संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने जिल्हा सवरेपचार रूग्णालयात तपासणीसाठी पाठविले जातात़ शहरात आतार्पयत मोहाडी उपनगर, साक्री रोड, झोपडपट्टी भाग, गोकुळनगर, गौरी सोसायटी, साईदर्शन कॉलनी या भागात डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळल्याने उपाययोजना सुरू आहेत़ महासभेतही डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली होती़ दरम्यान, केवळ शहरातच नव्हे तर  जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळत आहेत़ शिरपूरमध्ये डेंग्यूचे रूग्ण आढळले नसले तरी मलेरियाचे 10 रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्ह्यात आतार्पयत डेंग्यूचे 180 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 23 रूग्णांना डेंग्यू निष्पन्न झाला आह़े तर मलेरियाचे 1 लाख 94 हजार 860 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 53 रूग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आह़े  स्वाईन फ्लूची साथही शहरात पसरली असून दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आह़े मात्र मनपाकडे सध्यातरी दोनच रूग्ण आढळल्याची नोंद आह़ेशहरात साथीच्या आजारांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असतांना अस्वच्छतेची समस्या शहरी तसेच ग्रामीण भागातही कायम आह़े  जानेवारी ते जुलैर्पयत साथीच्या आजारांची रूग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ऑगस्ट व सप्टेबर या दोन महिन्यांत रूग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आह़ेपावसामुळे आजारांचे प्रमाण वाढल़े़गेल्या आठवडाभरात शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आह़े त्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांसह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून पर्यायाने डासांची घनता देखील वाढली आह़े शहरी व ग्रामीण भागात रोटेशन पध्दतीने कंटेनर सव्र्हे, फवारणी, धुरळणी, अॅबेटिंग, डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडणे, जनजागृतीचे काम करण्यात येत आह़े गेल्या वर्षी डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू असतांना मनपा आरोग्य विभागात औषधसाठा संपुष्टात आला होता, मात्र यंदा पुरेसा औषधसाठा उपलब्ध आह़े