शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यासाठी बी.टी.कापूस बियाण्यांची १.७५ लाख पाकिटे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 15:08 IST

बनावट बियाणे, कीटकनाशक विक्रेत्यांवर कारवाईसाठी पाच पथकांची नियुक्ती

ठळक मुद्देजिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईलजिल्ह्यासाठी ८ लाख ४० हजार बी.टी. कापसाची पाकीटांची मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यासाठी बी.टी. कापूस  बियाण्यांची १ लाख ७५ हजार पाकिटे उपलब्ध झाली असून, त्याची विक्री सुरू झालेली आहे. तसेच जिल्ह्यात खतांचीही चणचण भासणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी दिली.जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.जिल्ह्यासाठी ८ लाख ४० हजार बी.टी. कापसाची पाकीटांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी २१ मे पर्यंत १ लाख ७५ हजार बी.टी.कापूस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झालेली असून त्यांची विक्रीही सुरू झालेली आहे. मागणी केलेली बी.टी.ची पाकिटे १० जून १८ पर्यंत मिळतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे बी.टी.बियाण्यांची शेतकºयांना चणचण भासणार . तसेच खतांचाही पुरेसा साठा उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.पाच पथकांची नियुक्तीबनावट  बियाणे, खते, व कीटकनाशकांची विक्री करणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.त्यासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. यात प्रत्येक तालुक्यात एक-एक व जिल्हास्तरावर एक अशा पाच पथकांचा सवावेश आहे.  जिल्हास्तरीय पथकामध्ये कृषी विकास अधिकारी बैसाणे, रमेश नेतनराव आदींचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात बनावट बियाणांच्या १०४ तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या विभागामार्फत केलेल्या कारवाईत १०० बनावट बियाणांचे पाकिटे जप्त केली होती.  नॉन बिटी कॉटनच्या नावाखाली बिटी कॉटन सांगून बियाणांची विक्री केली जात होती. त्यानुसार कृषी विभागामार्फत केलेल्या कारवाईत ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर ५ विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित तर १७ विक्रेत्यांचे विक्री परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या विभागाने जिल्ह्यातील १ हजार १० बियाणे विक्रीच्या दुकानांची तपासणी केली होती.