शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार मतदारांची नव्याने नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 10:58 IST

युवा मतदार नोंदणी मोहीम : ३१ आॅगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मुदतवाढ

ठळक मुद्देदुबार १९७४ नावे वगळली मतदार यादीत दुबार नावे वगळ्याचे मुख्य उद्दिष्ट निवडणूक शाखेचे होते. त्यानुसारच तालुकानिहाय नियुक्त केलेल्या बीएलओंच्या सहकार्याने जिल्ह्याच्या एकूण मतदार यादीतून १ हजार ९७४ नावे वगळण्यात आली आहेत. तर साक्री तालुक्यात १७०, धुळे ग्राअद्ययावत मतदार यादी करण्याचे निर्देश प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की यावर्षी काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे महाविद्यालय उशिराने सुरू झाले आहे. तथापी अनेकांचे मतदार यतालुका १८ ते १९ वयोगटइतरएकूण साक्री१३२०१५५३२८७३ धुळे शहर १२९१२१४६३४३७ धुळे ग्रामीण१४४६४०२७५४७३ शिंदखेडा २१२९९०२३०३१ शिरपूर१०६२९३९२००१ एकूण७,२४८९,५६७१६,८१५

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे  : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे नवीन मतदारांच्या नाव नोंदणीसाठी जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात तब्बल १६ हजार ८१५ मतदारांची नव्याने मतदार यादीत नोंदणी झाली आहे. दरम्यान,  या मोहिमेला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मुख्य निवडणूक शाखेतर्फे ही मोहीम ३१ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मतदान हे राष्टÑीय कर्तव्य आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याउद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झालेल्या आदेशानुसार १ जुलैपासून मतदार नोंदणी अभियानास धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली होती. महाविद्यालयांमध्ये जनजागृती तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नवीन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. शिंदखेडा तालुक्यात तरुणांचा प्रतिसाद शिंदखेडा तालुक्यातील १८ ते १९ वयोगटांतील २ हजार १२९ तरुणांनी या विशेष मोहिमेंतर्गत मतदार यादीत नोंदणी करून घेतली. तर साक्री तालुक्यात १३२०, धुळे ग्रामीणमध्ये १४४६, धुळे शहर १२९१ व शिरपूर तालुक्यात १ हजार ६२ तरुणांनी त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवून घेतले आहे.