शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय बाबींसाठी 150 कोटी

By admin | Updated: February 3, 2017 23:48 IST

मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्ग : अर्थसंकल्पात तरतूद

धुळे : मनमाड - धुळे -इंदूर रेल्वेमार्गासाठी सहा महिन्यात प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने प्रामुख्याने हाती घेतले असून त्यासाठीच यंदाच्या अर्थसंकल्पात 150 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्ग साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबत जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करून निम्मा निम्मा अर्थात 5 हजार कोटी शिपिंग मंत्रालय आणि 5 हजार कोटी रेल्वे मंत्रालय खर्च उचलणार आहे. याबाबतचे प्राथमिक टप्पे पूर्ण झाले असून, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. दरम्यान, शिपिंग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय संयुक्तरित्या या मार्गाचा सव्र्हे करून त्यांचा सविस्तर डीपीआर अर्थात दैनंदिन प्रकल्प अहवाल सादर करतील. मग शिपिंग आणि रेल्वे मंत्रालयात संयुक्त करार होईल आणि त्यानंतर त्यास नीती आयोगाची मंजुरी मिळवून अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी घेण्यात येणार आहे. यासर्व प्रक्रियेस साधारत: सहा महिन्यांचा कालावधी लागेल, तो र्पयत या रेल्वेमार्गाच्या प्रशासकीय आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने   150 कोटींची तरतूद केली आहे.  केंद्र शासनाने  2017-18 सालच्या अर्थसंकल्पात देशभरात निर्माण करण्याच्या रेल्वेमार्गासाठी विशेष तरतूददेखील केली असून त्यात प्राधान्याने मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचा समावेश असल्याचे डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले. रेल्वे व जहाज बांधणी मंत्रालयाचा संयुक्त प्रोजेक्टजवाहरलाल नेहरू पोर्ट रेल्वेमार्गाशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी  प्रोजेक्ट अंतर्गत या रेल्वे मार्गाच्या कामास  निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  डॉ.सुभाष भामरे यांनी  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.