शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षापेक्षा 15 पट मिरचीची आवक वाढली

By admin | Updated: February 2, 2017 01:03 IST

दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे.

दोंडाईचा :  नगदी पीक म्हणून  ओळखल्या जाणा:या  कापसाला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने दोंडाईचा परिसरात मिरचीचे  क्षेत्र वाढले आहे. निसर्गाची कृपा व अन्य  बाजार समिती क्षेत्रातील शेतकरी दोंडाईचा बाजार समितीकडे वळल्याने दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा  सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे. गेल्यावर्षी  म्हणजे 2015-16 या आर्थिक वर्षात 3 हजार 888 क्विंटल  म्हणजे  एक कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची उलाढाल झाली आहे. तर या वर्षी 59 हजार 786 क्विंटल मिरचीची  आवक  झाली असून उलाढाल 12 कोटी 63 लाख 77 हजार 860 रुपयांची उलाढाल झाली आहे. येथील बाजारात मिरचीला सुरुवातीला 1700 ते 1800 रु. प्रतिक्विंटल भाव होता. नंतर आवक वाढली तर भाव सुद्धा वाढले असून सध्या 2966 रु. प्रतिक्विंटल भाव मिरचीला मिळत आहे.दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीच्या उलाढालीत आघाडीवर आहे. येथील मिरची उद्योग प्रसिद्ध आहे. दोंडाईचा परिसरात मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.           दोंडाईचा येथील मिरची भारतासह इराण, इराक, सौदी अरेबियाला पाठवली जात असे. परंतु मध्यंतरी मिरची उत्पादन व मिरची उद्योगालाही घरघर लागली होती. बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने मिरची उद्योगातून शेकडो अकुशल  कामगारांना रोजगार मिळाला आहे. दोंडाईचा शहराच्या पूर्व दिशेला म्हणजे शिंदखेडा रस्त्यावर मिरचीच्या पथारी आहेत. या पथारीवर शेकडो कामगारांना रोजगार मिळाला आहे. काही वर्षापासून निसर्गाची अवकृपा, अवकाळी पाऊस यामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बुरशीजन्य रोगामुळे  मिरचीचे उत्पादन घटले होते. बदलत्या हवामानामुळे शेतकरीही मिरची लागवड टाळत होता. बियाणे  महाग त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे साहजिकच मिरची उत्पादन घटले होते. महत्त्वाचे म्हणजे दोंडाईचा परिसरातील शेतकरी कापूस लागवडीपासून लांब जात आहे. कापूस नगदी पीक म्हणून ओळखले जात असले तरी कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. पैसेही रोख मिळाले नाहीत.   त्यामुळे शेतकरी साहजिकच कापसापासून दूर गेला. बागायतची सोय असलेला शेतकरी मिरची लागवडकडे वळला आहे.    वर्ष        आवक    2010-11      21 हजार 865 क्विंटल    2011-12      40 हजार 386 क्विंटल    2012-13      32 हजार 652 क्विंटल    2013-14      16 हजार 335 क्विंटल     2014-15      4 हजार 649 क्विंटल    2015-16      3 हजार 888 क्विंटल2016-17 यावर्षी आतापावेतो 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. गत वर्षापेक्षा तब्बल 15 पट मिरचीची आवक  वाढली असल्याची माहिती बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी दिली आहे.