शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षकाला भोवली १५ हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:03 IST

वनविभाग : एसीबीची कारवाई, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनविभागाच्या हद्दीतील विहिर खोदण्याची परवानगी देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणारा सर्वेक्षक मनोहर दौलत जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले़ शिवतिर्थाजवळील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली़ खुडाणे गाव दुष्काळ सदृश्य असून गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई आहे़ वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या गटात लोकसहभागातून घटबारी पाझर तलाव निर्माण केलेला आहे़ तलावाच्याखाली सिंचन विहिर खोदकामासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करुन पंचायत समिती साक्री येथे वनदावा विहिर खोदकामाचे प्रकरण दाखल केले होते़ हे प्रकरण कोंडाईबारी वन विभाग यांना दिल्याने या जागेचा पंचनामा, जीपीएस नकाशा, हात नकाशा काढून वनदावा प्रकरण वनविभागाकडे जमा करण्यासाठी दिले होते़ तक्रारदार याने हे प्रकरण धुळ्यातील सर्वेअर मनोहर दौलत जाधव यांची भेट घेतली़ त्यावेळी कागदपत्र अपूर्ण असल्याचे सांगून विहिर खोदण्याच्या प्रकरणात परवानगी मिळवून देण्यासाठी मदत करतो असे सांगत २५ हजार रुपये लाचेची मागणी केली़ तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याचे पडताळणीतून निष्पन्न झाले़ शुक्रवारी दुपारी उप वनसंरक्षक धुळे येथे सापळा लावण्यात आला असता १५ हजार रुपये घेताना मनोहर जाधव याला रंगेहात पकडण्यात आले़ ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, संदिप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, सतीष जावरे, भूषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे