शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहराची १४ वर्षानंतर हद्दवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:44 IST

अधिसुचना जाहीर : ४ गावांचा पूर्ण तर ७ गावांचा अंशत: समावेश

ठळक मुद्देहद्दवाढीमुळे जिल्हा परिषदेचे वलवाडी येथील सदस्य शांताराम रामदास राजपूत (भिल) व वलवाडीचेच पंचायत समिती सदस्य नरेश रूपला चौधरी आणि रंजना वाल्मिक वाघ यांचे सदस्य पद रद्द झाल्याचा शासनाच्या अधिसुचनेत स्पष्ट उल्लेख आहे.- धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते़ मात्र हद्दवाढीनंतर ते १०१़०८ चौकिमी इतके झालेहद्दवाढ जाहीर झाली असली तरी आता वाढीव भागाचे ले-आऊट घेऊन त्यांचा शहर विकास आराखड्यात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  धुळे शहराची पहिली हद्दवाढ अखेर लागू झाली असून ५ जानेवारीच्या तारखेने तयार झालेली अधिसूचना मनपाला बुधवारी प्राप्त झाली़ तत्पूर्वी शहराचे आमदार अनिल गोटे यांनी सोशल मिडीयावर अधिसूचना टाकत शहर हद्दवाढ झाल्याचे जाहीर केले़ ४ गावे पूर्ण तर ७ गावांचा अंशत: समावेश हद्दवाढीत झाला आहे़धुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते़ मात्र हद्दवाढीनंतर ते १०१़०८ चौकिमी इतके झाले असून दुपटीपेक्षा अधिक क्षेत्र मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे़ वलवाडी, महिंदळे, बाळापूर व पिंपरी या चार गावांचा पूर्णत: तर अन्य भोकर, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, मोराणे या गावांचा अंशत: समावेश करण्यात आला आहे़  तर चार पूर्णत: समावेश असलेल्या ग्रामपंचायतींमधील पदाधिकाºयांची पदे आता अस्तित्वात राहिली नसून ते धुळेकर नागरिक झाल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले़  दरम्यान, हद्दवाढ जाहीर झाली असली तरी आता वाढीव भागाचे ले-आऊट घेऊन त्यांचा शहर विकास आराखड्यात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मनपा सुत्रांनी सांगितले