शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १३५ कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:01 IST

नाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.

ठळक मुद्दे४३७ कोटींचा लक्ष्यांक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची वसुलीसाठी परतफेड योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक नुकतीच झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा बँकेच्या एक लाख तीन हजार थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला असून, त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत, त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करणाºया व पात्र शेतकºयांना पुरेशा निधीअभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले.जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना-२०२० जाहीर केली असून, सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. या योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कमदेखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.सहकारी संस्थांकडून कागदपत्रांची पूर्तताबँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून, खरीप कर्जवाटपाला गती येत आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना कर्ज देण्यास सुरुवात झाली असून, आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेस खरीप पीककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्ष्यांक पूर्ण करायचा असल्याने पात्र शेतकरी सभासदांनी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन आहेर यांनी केले आहे.पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कर्जवाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक