शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धुळे जिल्ह्यातील १२ जि.प. शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:29 IST

जिल्हा परिषद : साक्री तालुक्यातील सात शाळांचा समावेश

ठळक मुद्देजिल्ह्यात जि.प.च्या ११०३ शाळाजि.प.शाळेतील विद्यार्थी संख्या घटलीचार शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळांचे युडायस पूर्ण झाले असून, त्यानुसार जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमध्ये दहा व त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खाजगी खास करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील पाडे, तांड्यावर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यादृष्टीने सर्वच शाळांचे  सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यात केवळ सात शाळांमध्येच १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता शाळांचे युडायस पूर्ण झाले असून, त्यात जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याचे आढळून आले आहे.  साक्री तालुक्यात ७ शाळाया सात शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या साक्री तालुक्यातील आहेत. त्यात क्रिश्ननगर, खर्डबारी, केवाडीपाडा, धामदगावठाण, पवारपाडा, मोखापाडा, कुचीविहीर या येथील जि.प.शाळांचा समावेश आहे. तर धुळे तालुक्यात रामनगर, वणीखुर्द, बोरकुंड येथील शाळांचा समावेश आहे. शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळेचा समावेश आहे.शिक्षक दोन, विद्यार्थी मात्र पाच-सातचपहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळांसाठी प्रत्येकी दोन-दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या  कमी होती.विद्यार्थ्यांचे समायोजनज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १० पेक्षा कमी आहे, तेथील विद्यार्थ्यांचे  एक किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी चार शाळांमधील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया थांबलेली असल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.