शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा विकासाचा 11 कलमी कार्यक्रम

By admin | Updated: January 9, 2017 00:09 IST

जिल्हा परिषद : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांचा परामर्श, कामांना प्राधान्य

धुळे : समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात 11 कलमी कार्यक्रमामुळे विकासकामांना सुरुवात झाली आह़े महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, फळबाग लागवड, शेततळे, शौचालय, शोषखड्डे, रोपवाटिका अशा कामांचा समावेश करण्यात आला आह़े जिल्हा परिषद प्रशासनाने हा विषय प्रामुख्याने अंजेडय़ावर घेतला आह़े  अहिल्यादेवी सिंचन विहीर अंतर्गत उद्दिष्ट निश्चित झाले आह़े यात धुळे तालुक्यात 3 हजार 500, साक्री तालुक्यात 1 हजार 969, शिंदखेडा तालुक्यात 2 हजार 500 पैकी 2 हजार 46 आणि शिरपूर तालुक्यात 1 हजार 375 याप्रमाणे अर्जाद्वारे मागणी नोंदविण्यात आली. अमृतकुंड शेततळे अंतर्गत धुळे तालुक्यात 1 हजार 200 पैकी 163, साक्री तालुक्यात 1 हजार 500 पैकी 256, शिंदखेडा तालुक्यात 2 हजारापैकी 236 आणि शिरपूर तालुक्यात 900 पैकी 1 हजार 51 असे एकूण 5 हजार 600 पैकी 626 लाभाथ्र्यानी अर्ज सादर केले आहेत़  भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग योजनेंतर्गत धुळे तालुक्यात 600 उद्दिष्ट आह़े यात एकाही अर्ज नेलेला नाही़ साक्री तालुक्यात 600 पैकी 197, शिंदखेडा तालुक्यात 1 हजार 500 पैकी 34 आणि शिरपूर तालुक्यात 600 पैकी 18 जणांनी अर्जाद्वारे मागणी नोंदविलेली आह़े भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगअंतर्गत साक्री, धुळे आणि शिरपूर तालुक्यात 600 इतके उद्दिष्ट देण्यात आलेले आह़े यात साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात एकानेही मागणी अर्जाद्वारे नोंदविलेली नाही़ धुळे 600 पैकी 48 आणि शिरपूर तालुक्यात 600 पैकी 20 इतक्या जणांचा समावेश आह़े कल्पवृक्ष फळबाग लागवड उपक्रमांतर्गत धुळे 1 हजारपैकी 571, साक्री 1 हजार 200 पैकी 431, शिंदखेडा 1 हजार 500 पैकी 439 आणि शिरपूर 500 पैकी 139 जणांनी मागणी नोंदविली आह़े निर्मल शौचालयासाठी धुळे, साक्री आणि शिरपूर तालुक्यात प्रत्येकी 1 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आल़े त्यात धुळ्यातून 837, साक्रीतून 408 आणि शिरपूरमधून 745 जणांचे अर्ज आलेले आहेत़ शिंदखेडय़ात 1 हजार 500 पैकी केवळ 104 जणांनी प्रतिसाद दिलेला आह़े निर्मल शोषखड्डय़ांसाठी धुळे आणि साक्रीतून 900 शिरपूरमधून 700 तर शिंदखेडय़ातून 1 हजार 500 इतके उद्दिष्ट देण्यात आले आहेत़ त्यात धुळ्यातून केवळ 7 जणांनी प्रतिसाद दिला़ उर्वरित तिन्ही तालुक्यातून एकही अर्ज आलेला नाही़ तसेच नंदनवन वृक्ष लागवड, रस्ते, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभिकरण, पशुसंर्वधनविषयक कामे मार्गी लावली जात आहेत़