शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील १० हजार दुधाळ जनावरांना मिळाले ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:04 IST

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना बिल्ला देणार

ठळक मुद्देजिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची संख्या ८९ हजार ४४पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना टॅगिंग केले जाणारपशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जनावरांची ओळख होण्यासाठी केंद्र शासनाने पशुसंजीवनी योजना सुरू केलेली आहे. आधारप्रमाणेच जनावरांनाही बारा अंकी युनिक कोड देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ११४ दूधाळ गायी-म्हशींना टॅग (बिल्ला) लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली. देशभरातील जनावरांना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मिशन आॅफ बोव्हाईन प्रॉडक्टीव्हिटी’ या योजनेंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार जनावरांना युनिक आयडेंटीफिकेशन कोड असलेला फायबरचा टॅग लावण्यात येत आहे. यामाध्यमातून जनावरांची सर्व माहिती शासनाला एक क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.२०१२च्या १९ व्या पशुगणणेनुसार जिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची एकूण  संख्या ८९ हजार ०४४ आहे. यात दूधाळ गायींची संख्या ५४ हजार ९१५ तर  म्हशींची संख्या ३४ हजार १२९ एवढी आहे.  पहिल्या टप्यात ३७ हजार गायी-म्हशींना टॅगिंग केले जाणार आहे.  त्यापैकी आतापर्यंत १० हजार ११४ जनावरांना बिल्ला लावण्यात आलेला आहे. यात ६ हजार ४८४ गायी तर ३ हजार ६३० म्हशींचा समावेश आहे. उर्वरित जनावरांना बिल्ला लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.इत्यंभूत माहिती मिळणारया नवीन योजनेनुसार जनावरांनाही आधारकार्डाप्रमाणेच १२ अंकी युनिक आयडी कोड मिळणार आहे. संगणकावर हा आकडा टाकल्यास, जनावराच्या मालकाचे नाव, गाव, ते जनावर कुठल्या जातीचे आहे, दूध किती देते, लसीकरण कधी झाले आदींची इत्यंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जनावरांची खरेदी-विक्री करतांना, शासकीय योजना देतांनाही याचा लाभ होणार आहे.