शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

१६ केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. मात्र, या केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्यापही खरेदीला सुरुवात झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यात यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. मात्र, दुसरीकडे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला. मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी उरकून घेतल्या. ज्वारी, गव्हासोबतच हरभऱ्याचाही पेरा केला. निसर्गाच्या कृपेने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. केंद्र शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला. शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी २१ केंद्र कार्यान्वितही केली आहेत. या केंद्रांवर १५ फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ६ हजार ५६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३ हजार ३३२ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. २१ केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्याप खरेदी झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

चौकट...

केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. आडतीवर ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, अनेक शेतकरी केंद्रावर पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिवाय चाळणी व हमालीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडतीवर क्विंटलला तीनशे ते चारशे रुपयाने कमी भाव मिळत असला, तरी लवकर पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारी असतील तर संपर्क साधावा

जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर चाळणीसाठी अधिकचे शुल्क, हमालीचे जादा पैसे मागितल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कोट...

जिल्ह्यात २१ हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला आहे. शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी त्वरित नावनोंदणी करुन घ्यावी, संदेश प्राप्त झाल्यानंतर नजीकच्या केंद्रावर हरभरा विक्रीसाठी घेऊन यावा.

- व्ही. एच. वाचपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी